अखेर बायडन प्रशासन नरमले! कोरोना लसीच्या निर्मितीसाठी कच्चा माल देण्यास अमेरीका राजी

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. असे असताना लसीकरण सुरू झाले मात्र पुन्हा लसींचा मोठा तुटवडा जाणवू लागला. अमेरिकेने कच्चा माल पुरवठा बंद केल्याने लस निर्मितीला ब्रेक लागला होता.

केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे जाहीर केले आहे. भारताने वारंवार अमेरिकेकडे कच्च्या मालाची मागणी केली होती. अखेर अमेरिकेने भारताला लसी निर्मितीसाठी कच्चा माल देण्याचे मान्य केले आहे.

जो बायडेन प्रशासनाकडून भारताला याबाबत माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ही माहिती दिली. त्यामुळे पुन्हा एकदा लस निर्मितीला जोर येणार आहे.

याबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांनी ट्विट करून अमेरिकेकडे ही मागणी केली होती. अमेरिका आणि युरोपने पुरवठा थांबवला असल्याचे त्यांनी सांगितले होते. यामुळे लस निर्मिती थांबणार का .? असा प्रश्न सर्वांना पडला होता.

त्यानंतर अमेरिकेवर दबाव वाढू लागला होता. अखेर अमेरिकेना भारताची मागणी मान्य केली असून लवकरच लसी निर्मितीसाठी कच्चा मालाचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे लस निर्मितीची अडचण दूर होणार आहे.

देशात लसीकरण केले तरच कोरोनाला ब्रेक लागेल अशी आशा निर्माण झाली आहे. लसीकरण केल्यानंतर फार कमी लोकांना कोरोना होत असल्याचे दिसून येत आहे. सरकारने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

ताज्या बातम्या

एकट्या जडेजाने अख्खी आरसीबी धू धू धूतली; बॅटने तर धुतलीच पण बाॅलने सुद्धा सोडली नाही

कोरोनाने मुलाला हिरावले; ही वेळ दुसऱ्यांवर येऊ नये म्हणून आईवडीलांनी तोडली १५ लाखांची एफडी

अक्षय कुमार होता काजोलचा पहीला क्रश; पार्टीमध्ये त्याला शोधत बसायची अभिनेत्री

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.