सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकली आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक चिमुकला त्याच्या वडिलांनी आणलेली सेकंड हँड सायकल पाहून खूप खुश झालेला पहायला मिळत आहे.
काही लोकांची स्वप्न खूप मोठी असतात, तर काही लोकांची स्वप्न खूप लहान असतात. सोशल मीडियावर एक लहान मुलाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मुलाचे वडील सायकलची पूजा करताना दिसत आहेत, तर तो मुलगा आनंदाने टाळ्या वाजवताना दिसत आहे.
आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. अवनीश शरण यांनी शेअर केलेल्या व्हिडिओला एक कॅप्शन दिल आहे. ‘ही केवळ एक सेकंड हँड सायकल आहे. पण त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहा. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा मर्सिडीज कार खरेदी केल्यासारखा आहे.’
https://twitter.com/AwanishSharan/status/1527843138210975746?s=20&t=O8jaQ5vwtRVHTFRGXbqSDA
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी देखील पसंती दिली आहे. व्हिडिओला अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. नेटकऱ्यांनी मुलाचे आणि त्याच्या वडिलाचे कौतुक केले आहे. या व्हिडीओनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
नेटकऱ्यांनी या व्हिडिओला कॅप्शन दिल आहे. “सुंदर” तर दुसरा म्हणाला, ‘मला देखील माझी सायकल आवडते. तिच्यासोबत माझ्या बऱ्याच आठवणी आहेत.’ तर एक युझर म्हणाला, ‘आनंदाची किंमत नसते.’ नेटकऱ्यांनी या व्हिडिओला अशा प्रकारे प्रतिसाद दिला आहे.
सोशल मीडियावर अवनीश हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टला पसंती दर्शवली आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला 80 हजारपेक्षा जास्त लाइक केलं आहे.
महत्वांच्या बातम्या:-
‘आता उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरातांच्या थेट घरात घुसणार’
पिझ्झा खाण्यापेक्षा भाकरी खात जा, मुलं तुमचं पाहूनच शिकतात; आशा भोसलेंच्या महिलांना फिटनेस टीप्स
१० दिवसांपासून जेलमध्ये तरी आपल्या भूमिकेवर केतकी चितळे ठाम, चेहऱ्यावरच हसू अजूनही कायम