‘मला मुख्यमंत्री करा’ असे म्हणणारे बिचकुले यांनी पुण्यात सुरू केला नवीन व्यवसाय, वाचा…

पुणे । बिग बॉसपासून ते राजकारण सगळीकडे बिग बॉसच्या सिजन २ च्या पर्वात कवी मनाचे नेते म्हणून अभिजित बिचुकले सर्वांना परिचित आहेत. अभिजित बिचुकले अनेक वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. ते हे मूळचे सातारा जिल्ह्यातले आहेत. अनेकदा निवडणूकीत त्यांनी नशीब अजमावले मात्र आजपर्यंत त्यांना यश मिळाले नाही.

अगदी नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीच्या पदासाठी त्यांनी प्रयत्न केले. खासदार उदयनराजे भोसले यांना आव्हान देणारा बिचुकले नेहेमी चर्चेत राहिला. मीच मुख्यमंत्री होणार, सातारा माझी गादी मी छत्रपतींचा वैचारिक वारसदार, कवी मनाचा नेता, अशा अनेक वक्तव्याने तो चर्चेत राहीला.

त्यांना बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून प्रवेश मिळाला होता. त्यांना चेक बाऊन्स प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्यांची अभिनेत्री शिवानी सुर्वे सोबत चांगली मैत्री जुळली होती. आता अभिजित बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, याचे कारण म्हणजे त्याने सुरू केलेला नवीन व्यवसाय.

नुकतेच त्यांनी पुण्यात स्वतःचा सातारा कंदी पेढे विक्री व्यवसाय सुरू केला आहे. बिग बॉसच्या २ ऱ्या सिजनचा कंटेस्टंट पराग कान्हेरे याने नुकतीच ही बातमी सांगितली आहे. साताऱ्याचे प्रसिद्ध कंदी पेढे आता पुणेकरांना बिचुकलेच्या दुकानात मिळणार आहेत.

पुण्यातील शारदा गणपती मंदिराजवळ त्यांनी हे कंदी पेढ्यांचे दुकान आहे. पराग कान्हेरेने बिचुकले यांना त्यांच्या या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बिचुकले’ यावेळी नाही चुकले, असे म्हणून बिचुकले यांचे त्याने अभिनंदन केले आहे. आता बिचकुले यांचे दुकान आहे, म्हणून ग्राहक भेट देणार का हे लवकरच समजेल.

बिचकुले याने अनेकदा विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्याला यश आले नाही. तो राज्य सरकारवर देखील सतत टीका करत असतो. यामुळे तो कायमच चर्चेत असतो. पोलिसांनी देखील त्याला अनेकदा अटक केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.