सर्वांना खळखळून हसवणाऱ्या भुवन बामवर कोसळला दु:खाचा डोंगर; कोरोनामुळे गमावले आई-वडिल

कोरोनाच्या काळात अनेक धक्कादायक घटना घडत आहे. रोज हजारो लोकांचा मृत्यु होत आहे, तर अनेक कलाकारांचाही कोरोनामुळे मृत्यु होत आहे. अशात आणखी एक धक्कादायक बातमी आता समोर आली आहे.

लोकांना खळखळून हसवणाऱ्या युट्युबवर भुवन बामच्या आई-वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. भुवनने याबाबत इन्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सर्वांना याबाबतची माहिती दिली आहे.

कोविडमुळे मी माझ्या पालकांना गमावले आहे. आई आणि बाबांशिवाय काहीही पहिल्यासारखे राहिलेले नाही. एका महिन्यात सर्व काही उध्वस्त झाले आहे. घर, स्वप्न सर्व काही. माझी आई माझ्याजवळ नाही, माझे बाबा माझ्याजवळ नाही. आता पुन्हा जगायला शिकावे लागेल, पण मन ऐकत नाहीये, असे भुवनने पोस्टमध्ये म्हटले आहे.

तसेच मी चांगला मुलगा होतो का? मी त्यांना वाचवण्यासाठी सर्वकाही केले का? मला या प्रश्नांसोबत कायमचे जगावे लागेल. मला त्यांना पुन्हा बघायचे आहे. मी त्यादिवसाची वाट बघत असून तो दिवस पण लवकरच येईल, असेही भुवन बामने पोस्टमध्ये म्हटले आहे.

भुवन बामच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. राजकुमार राव, वरुण धवन, ताहीरा कश्यप, आशीष चंचलानी, कॅरी मिनाटी, मुकेश छाबडा यांनीही भुवन बामच्या पोस्टवर शोक व्यक्त केला आहे.

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात भुवन बामलाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही दिवस उपचार केल्यानंतर तो बरा झाला होता. भुवन बामचे बीबी की वाईन्स नावाचे युट्युब चॅनेल आहे. भुवन कॉमेडी व्हिडिओ बनवून लोकांना एंटरटेन करण्याचे काम करतो.

महत्वाच्या बातम्या-

नागिणीने घेतला नागाच्या हत्येचा बदला,नागाची हत्या करणाऱ्याला तिने शोधलं आणि..
मोठा खुलासा! खासदार-अभिनेत्री नुसरत जहाँचे लग्नापूर्वी होते ‘या’ आरोपीसोबत प्रेमसंबंध
अखेर मृत्यूशी झुंज अपयशी! बहिणीने भावासाठी केलं होत यकृत दान, शस्त्रक्रियेनंतर भावाचा मृत्यू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.