‘होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा’, भूषणसिंह होळकरांची टीका

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याहस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे आज अनावरण होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषण सिंह होळकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार या सगळ्याच्या माध्यमातून राजकारण करु पाहत असल्याचा आरोप भूषण राजे होळकर यांनी केला.

याबाबत बोलताना होळकर म्हणाले, ‘आपण जर माहिती घेतली तर जेजुरी परिसरात हे लोकं प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे होळकरांच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहेत, हे दिसेल. त्यासाठी हा उद्योग सुरु आहे, असा गंभीर आरोप भूषणसिंह होळकर यांनी केला आहे.

याचबरोबर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहू नये, जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी यांच्या पुतळ्यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून शरद पवार यांच्याकडून राजकारण होत आहे. छत्रपती घराणे सर्व समाजाचे भल्याचा विचार करणारे असल्याने छत्रपती संभाजी राजेंना या कार्यक्रमाला न जाण्याची विनंती केल्याचे भूषण राजे होळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल; अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचं अनावरण पडलं महागात
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. तसेच पोलीस कामात अडथळा आणण्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पूजा चव्हाण आत्मह.त्येप्रकरणी चर्चेत आलेले संजय राठोड आहेत तरी कोण?
“वाट कसली बघताय? मंत्री संजय राठोडांच्या मुसक्या आवळा”
पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरण! पंकजा मुंडेंनी केली ‘ही’ मागणी; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.