बिग ब्रेकींग! मुख्यमंत्र्यांच्या वडीलांना पोलीसांनी केली अटक; देशातील पहिलीच घटना

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील 86 वर्षीय नंदकुमार बघेल यांना ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. वडील म्हणून मला त्यांचा आदर असला तरी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे सांगून मुख्यमंत्री बघेल यांनी याप्रकरणी कारवाईमध्ये हस्तक्षेप केला नाही.

नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.ब्राह्मण हे परकीय असून, त्यांच्यावर बहिष्कार टाका. त्याचबरोबर आपल्या खेड्यामध्ये त्यांना प्रवेशही देऊ नका, असे बघेल म्हणाले होते.

या विरोधात सर्व ब्राह्मण समाजाने या संघटनेच्या तक्रारीनंतर रायपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धर्म, जात, वंश इत्यादींच्या आधारावर विविध समुदायांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा आरोपाखाली त्यांच्यावर विविध कलमे लावण्यात आली आहेत.

रायपुर पोलिसांनी नंदकुमार बघेल यांना रायपूर येथील न्यायालयात हजर केले होते. त्यांना पंधरा दिवस न्यायालयीन कोठडीत देखील रवानगी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या
‘तो’ शब्दही घाणेरडा; घटस्फोटानंतर शिखर धवनच्या बायकोची भावूक पोस्ट वाचून तुम्हीही हळहळाल
देव तरी त्याला कोण मारी! मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या तरुणाच्या पांघरुणात शिरला कोब्रा, जाग आली अन्…
अक्षय कुमारवर कोसळला दुःखाचा डोंगर, रडून रडून झाला बेहाल; केली ‘अशी’ भावनिक पोस्ट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.