गेल्या अनेक दिवसांपासून राणा दाम्पत्य चांगलेच चर्चेत आहेत. आज ३६ दिवसानंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा अमरावतीत(Amarvati) दाखल झाले. यावेळी युवा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. राणा दाम्पत्याची भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली. यावेळी राणा दाम्पत्य आणि भीम ब्रिगेड कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला.(bhim brigade and rana cople fight)
मिळालेल्या माहितीनुसार, राणा दाम्पत्य बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ हनुमान चालिसा पठाण करणार आहे, अशी माहिती भीम ब्रिगेडचे कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानंतर भीम ब्रिगेडचे कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याचा विरोध केला. यावेळी राणा दाम्पत्य आणि भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्यामुळे राणा दाम्पत्य आणि भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ संविधानाचे पठण करा, हनुमान चालिसाचे नाही, असे भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांहे म्हणणे होते. तशी मागणी देखील भीम ब्रिगेडने केली होती. या मुद्यावरून राणा दाम्पत्य आणि भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
राणा दाम्पत्य बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ संविधानाचे पठण करणार आहेत, अशी माहिती मिळाली होती. म्हणून या ठिकाणी आलो, असे भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. या सर्व प्रकरणावर खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या संविधानाच्या हक्काच्या आधारे आम्ही संसदेत भांडतो. तो हक्क फक्त बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे”, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
हनुमान चालिसा पठणाच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यामध्ये वाद रंगला होता. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची मागणी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी केली होती. त्याकरिता राणा दाम्पत्य मुंबईत देखील आले होते. यानंतर राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता.
मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याच्या मागणीमुळे राणा दाम्पत्य चांगलेच अडचणीत सापडले होते. या प्रकरणी राणा दाम्पत्य १४ दिवस तुरुंगात होते. त्यानंतर जामिनावर राणा दाम्पत्याची तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राणा दाम्पत्याने थेट दिल्लीत जाऊन हनुमान चालीसा पठण केले होते.
महत्वाच्या बातम्या :-
आगामी काळात देशाचा पंतप्रधान मीच होणार; ‘रासप’च्या महादेव जानकरांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
भाजपा मंत्र्याने स्वत:लाच लोखंडी साखळीनं मारले; लोकांनी पैसे उडवले, वाचा नेमकं काय घडलं?
“शिवेंद्रराजे यांनी कितीवेळा पक्ष बदललाय, आम्हाला आमचं तोंड उघडायला लावू नका”