संजय राऊत (Sanjay Raut): पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी रविवारी सकाळी संजय राऊत यांच्या घरावर ईडीचा छापा पडला होता. दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा संजय राऊत यांना अटक करण्यात आली. त्यानंतर दुपारी दोन वाजता त्यांना कोर्टात आणले गेले.
ईडी कार्यालयात आठ तास चौकशी केल्यानंतर संजय राऊत यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी त्यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील अवैध पैशाचा लाभ संजय राऊतांच्या कुटुंबाने घेतला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. जवळपास १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये त्यांना देण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
“ईडी प्रकरणात मला कोर्टानं क्लिनचीट दिली आहे. ईडीचा विषय आता माझ्यासाठी संपला आहे. कुठल्याही गोष्टीला क्लीनचीट देण्यासाठी कोर्ट आहे. ईडीची कारवाई विशिष्ट पद्धतीनं होत असते. संजय राऊत निर्दोष असतील कोर्टात सिध्द करावं, मीही तेच केलं,” असं वक्तव्यं खासदार भावना गवळी यांनी याप्रकरणी केलं आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणार आहेत. “देवेंद्र फडणवीसांनी खूप मोठं मनं केलं. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं. एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार आहोत. हजारोच्या संख्येनं समर्थक सत्कार करणार आहेत,” असेही भावना गवळी म्हणाल्या.
भावना गवळी या वाशीम-यवतमाळ लोकसभेच्या शिवसेनेच्या खासदार असून त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले आहे. त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्ते मुख्यमंत्री शिंदे यांना समर्थन देण्यासाठी मुंबईत गेले आहेत. खासदार भावना गवळींच्या नेतृत्वाखाली ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
Amir Khan: लालसिंग चढ्ढावर होतेय बहीष्काराची मागणी, करीना म्हणाली चित्रपट चांगला असेल तर कसा घालणार बहीष्कार?
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
काँग्रेसमध्ये लवकरच मोठा भूकंप! जेष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार?
शिवसेना काहीच दिवसांत संपून जाईल; जे.पी. नड्डांच्या या वक्तव्यावर ठाकरे संतापले; म्हणाले दुसऱ्यांना संपवण्याच्या नादात…