डोंबिवलीतून फास्ट ट्रेन ते स्वतःची गाडी, वाचा भाऊ कदम-कुशल बद्रिकेच्या दोस्तीचा भन्नाट किस्सा!

‘चला हवा येऊ द्या’ ही कथाबाह्य मालिका संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवण्यासाठी नेहमी सज्ज असते.  ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान  निर्माण केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्र अतिशय सुंदररीत्या आपली भूमिका बजावत असते. इतर कलाकाराच्या आवाजापासून ते वेशभूषेपर्यत हुभेहूब नक्कल करून इतरांना हसवण्याचा प्रयत्न करतात.

यातीलच एक लोकप्रिय विनोदवीर जोडी म्हणजे भाऊ अर्थात भालचंद्र कदम आणि कुशल बद्रिके.  २००० पासून सुरु झाली ही मैत्री आज २०२१ मध्ये आणखी बहरताना दिसतेय. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आपल्याला पाहायला मिळतात. शुटींगमधून वेळ मिळताच अनेक विनोदी व्हिडीओ तयार करून सोशल मिडीयावर शेअर केलेले पाहायला मिळतात.

त्यांच्या अतूट मैत्रीबद्दल सांगताना कुशल  म्हणतो की, मी नेहमीच भाऊचा फॅन होतो आणि कायमच राहणार. आम्ही दोघे ‘यदा कदाचित’ या नाटकादरम्यान पहिल्यांदा भेटलो. हळू हळू एकमेकांशी बोलायला लागलो. दोघेही एकाच ठिकाणी राहायला असल्याने एकत्र प्रवास करायचो त्यामुळेच आमची मैत्री गट्ट झाली.

दोघानाही सुरवातीच्या काळात भरपूर संघर्ष करावा लागला. डोंबिवलीतून लोकल पकडून ते दोघे शूटिंगला हजार व्हायचे. १४ एप्रिल २०१० रोजी फू बाई फू ही विनोदी मालिका सुरु झाली. या मालिकेत त्या दोघांनीही काम केल. फू बाई फू मध्ये काम करत असताना शुटींगला उशीर होईल या भीतीने दोघेही मिळेल ती ट्रेन पकडून जायचे.

एकदा फू बाई फू शुटींगला जाण्यासाठी दोघांनाही निघायला उशीर झाला म्हणून मिळेल ती ट्रेन पकडून जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ट्रेन आली तेव्हा त्यांना कळाल की खूप गर्दी आहे परंतु असा तसा प्रयत्न करून ते गर्दीत चढले. त्या ट्रेनमध्ये भजनी मंडळ चालले होते.

या दोघांना पाहून ट्रेनमधील लोकांना खूप आनंद झाला. त्यांनी या दोघांभोवती गर्दी केली, या दोघांना बसायला जागा दिली. तसेच भजनी मंडळाने या दोघांसाठी भजन गायले. एवढ सगळ्याचं प्रेम पाहून दोघेही भारावून गेले. त्यावेळी भाऊ कुशलला म्हणाले की, उद्या हीच लोकं आपल्याला कार घ्यायला भाग पडतील बघ!

काही दिवसानंतर कुशल आणि भाऊ कुशलच्या बाईकवरून डोंबिवली ते मीरारोड हा पल्ला दररोज पार करू लागले. संघर्षाचा काळ सुरूच होता. बाईकमध्येही अर्धे-अर्धे पैसे काढून ते पेट्रोल भरून, प्रवास करायचे. आता दोघांकडेही गाड्या आहेत परंतु तरीही ते एकाच गाडीने प्रवास करतात. आजूनही त्या दोघांमधील मैत्री तशीच टिकून आहे जशी सुरवातीला होती.

हे ही वाचा-

जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या मुलाला तुरूंगातून पळवण्यासाठी आईने खोदले ३५ फूट लांबीचे भुयार

छोटा राजन जिवंत, कोरोनामुळे मृत्यु झाल्याची बातमी खोटी; एम्सने दिली महत्वाची माहिती

भारतावर जडला ब्रिटिश खेळाडूचा जीव; भारतबद्दल बोलला असं काही की तुम्हालाही अभिमान वाटेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.