Share

साध्याभोळ्या भाऊ कदमची लेक सौंदर्याच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींनाही टाकते मागे; पहा सुंदर फोटो

सध्या अभिनेता भाऊ कदम हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय विनोदवीर आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे अभिनेता भाऊ कदम महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये पोहचला आहे. अभिनेता भाऊ कदम(Bhau Kadam) नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर देखील अभिनेता भाऊ कदम फार सक्रिय असतो. तो नेहमीच आपल्या मुलांसोबतचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.(bhau kadam duaghter photo viral on social media)

सध्या अभिनेता भाऊ कदमची मोठी मुलगी चर्चेत आली आहे. तिचे नाव मृण्मयी भालचंद्र कदम असं आहे. मृण्मयी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मृण्मयीचे स्वतःचे युट्युब चॅनेल देखील आहे. मृण्मयीचे युट्युबवर हजारो सबस्क्राइबर आहेत.

मृण्मयीचे महाविद्यालयीन शिक्षण एन. जी. बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्समधून झाले आहे. सोशल मीडियावर अनेकदा मृण्मयी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सौंदर्याच्या बाबतीत मृण्मयीने अनेक अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. तिच्या फोटोंची नेहमीच चर्चा होत असते. सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर अनेकजण प्रतिक्रिया देखील देतात.

वडिलांप्रमाणे चित्रपट क्षेत्रात किंवा टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण करणार का? असा सवाल अनेक युजर्सनी सोशल मीडियावर तिला विचारला आहे. पण तिने यावर उत्तर देण्याचे टाळले आहे. फॅशनच्या बाबतीत मृण्मयी खूप ग्लॅमरस आहे. ती नेहमीच वेगवेगळ्या फॅशन स्टाइलचे कपडे परिधान करून फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असते.

नुकताच मृण्मयीने कुत्र्याच्या पिल्लासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला मृण्मयीने कॅप्शन देताना लिहिले की, “तुझं घरात स्वागत आहे.” या फोटोवर अनेक मराठी सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. . ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री श्रेया बुगडेने देखील मृण्मयीच्या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
काकूची हातसफाई! दुकानातील गर्दीतून असा मोबाइल चोरला, व्हिडिओ बघून विश्वास बसणार नाही
मोठी बातमी! ‘या’ महीन्यात मुंबई सहावेळा पाण्याखाली जाणार; हवामान विभागाचा अलर्ट
मथुरेतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाबाबत मोठी बातमी; ‘विहिरीत सापडले शिवलिंग’

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now