“वार्ड रचना रद्द करून ग्रामपंचायत सदस्य जनतेतून निवडा”; भास्कर पेरे पाटलांची मागणी

पंढरपूर तालुक्यातील नवनिर्वाचित सदस्यांसाठी डीव्हीपी उद्योग समूहाच्या वतीने इसबावी येथील श्रीराम मंगल कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी यावेळी आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील ‘वार्ड पध्दत रद्द करुन सदस्यांची निवड जनतेतून व्हावी’ अशी मागणी केली आहे.

संपुर्ण राज्यात गाजलेल्या आदर्श गाव पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांची २५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना पेरे पाटील म्हणाले, “ग्रामपंचायतीच्या सरपंचाची जनतेतून निवड करणे ही पध्दत चांगली होती. त्यानंतर आता सदस्यांमधून सरपंचाची निवड केली जाणार आहे. हीपण पध्दत चांगली आहे.”

“पण, यापुढे जावून आता वार्ड पध्दत रद्द करुन सदस्यांची निवड जनतेतून व्हावी. तसा राज्य शासनाने कायदा करावा”, अशी मागणी पेरे पाटील यांनी केली. सरपंचपदाचा घोडे बाजार थांबवण्यासाठी निवडणुकीनंतर आरक्षण सोडत जाहीर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत त्यांनी केले.

दरम्यान पाटोदा ग्रामपंचायतीत लागलेला निकाल ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. ज्या पाटोदा गावाचे नाव आदर्श ग्रामपंचायत आणि आदर्श सरपंच म्हणून देशभरात पोहचले त्यांच्याच पॅनेलला गावकऱ्यांनी नाकारले.

धक्कादायक! ‘या’ प्रसिद्ध वेबसाइटवर पॉर्न व्हिडीओ पाहिल्यात तर तुमचा डेटा चोरीला गेलाय

राष्ट्रवादीच्या आमदाराने अयोध्येतील राममंदीरासाठी दिली तब्बल १० लाखांची देणगी

फॅक्ट चेक: १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार?; केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.