बापरे! ४ फ्लॅट, ५० तोळे सोनं, २२ लाख कॅश; ३५ हजार पगार असणाऱ्या सोसायटी मॅनेजरकडे कोटींची मालमत्ता

मध्य प्रदेशच्या झाबुआ येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. या शहरातल्या एका सेवा सहकारी सोसायटीच्या व्यवस्थापकाच्या घरुन लाखोंची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर छापेमारी केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

सोसायटीच्या व्यवस्थापकाचे नाव भरतसिंग हाडा असे आहे. त्यांचे राहणीमान पाहून त्यांचा पगार ३५ हजार रुपये असेल याचा कोणालाही अंदाज आला नसेल. २५ वर्षांच्या सेवेमध्ये त्यांनी भरपूर संपत्ती कमावली.

त्यांचा रंभापुरातील आलिशान बंगला एखाद्या चित्रपटातील बंगल्यासारखा दिसून येतो. या बंगल्यात जिमही आहे. लोकायुक्तांनी त्याच्या तीन ठिकाणांवर छापे घातल्यानंतर प्रत्येकाला धक्काच बसला आहे. गुरुवारी सकाळी लोकायुक्त संघाने रतलाम, झाबुआ, रंभापूर येथील भरतसिंग हाडाच्या तीन घरांवर छापा टाकला.

लोकायुक्त कार्यवाही सुरू झाल्यापासून तो बेपत्ता आहे. मात्र, फोन चालू आहे. हाडा म्हणतो की माझ्याविरोधात बऱ्याच काळापासून तक्रारी होत्या. कारवाई अपेक्षित होती. वेळ आल्यावर मी सर्व कागदपत्रे सादर करेन. भरतसिंह हे मूळचे माल्टोडी गावचे आहेत.

आतापर्यंत हाडाची १.२५ कोटींपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता उघड झाली आहे. यामध्ये ४ फ्लॅट, ५० तोळे सोने, २२ लाख रुपये रोख, चांदीची भांडी, दोन प्लॉट, दोन कार, १० एलआयसी पॉलिसी, ५ लाख रुपयांची एफडी, शेतजमीन आणि इतर वस्तू सापडल्या आहेत. या टीमला काही बँक खातीही मिळाली आहेत. पथकाने काही कागदपत्रेही जप्त केली आहेत.

भरत सिंह १९९७ मध्ये सेल्समन म्हणून भरती झाले. २०१४ मध्ये ते सहाय्यक व्यवस्थापक झाले. २०१७ मध्ये व्यवस्थापक बनले. त्याचा पगार सुमारे ३५ हजार रुपये आहे. त्यांना सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी २६ हजार रुपये मिळायचे. त्याच वेळी, सेल्समन असताना त्याला सुमारे ८ ते १२ हजार रुपये मिळायचे.

महत्वाच्या बातम्या-

सरकार झोपा काढतय! मिरचीला १ रूपये किलोचा भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने झाडे उपटली; व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी येईल
नितीन गडकरी म्हणाले, ‘…मी सासऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवला होता’, वाचा संपूर्ण किस्सा
मनोहरमामा लोकांचे आधार नंबर, पॅन नंबर कसा काय ओळखायचा? गुपित फुटले; आली धक्कादायक माहीती समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.