भारतीय व्यापाऱ्यांची ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर, लॉन्च झाले ‘भारत ई-मार्केट’ मोबाईल ऍप

मुंबई | ऑनलाइन शॉपिंगसाठी जवळपास सर्वच लोक ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट या चर्चेत असणाऱ्या कंपन्यांची निवड करतात. परंतु आता कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स(कॅट CAIT) च्या व्यापाऱ्यांनी ऑनलाइन विक्री करणाऱ्या या बड्या ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्ध दंड थोपटले आहेत.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सने महाशिवरात्रीनिमित्त ‘भारत ई-मार्केट’ हे ऑनलाइन मोबाईल ऍप्लिकेशन लाँच केले आहे. याअंतर्गत मुंबई आणि परिसरातील दहा लाख व्यापारी जोडले जाण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, कॅट ही देशभरातील व्यापाऱ्यांची प्रमुख संघटना आहे. देशातील २० हजार व्यापारी संघटनांमधील कोट्यावधी व्यापारी संघटनेशी संलग्न आहेत. कॅटच्या दाव्यानुसार ‘भारत ई-मार्केट’ वर ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू आणि सेवा देण्यात येणार आहेत.

ऑनलाइनमुळे किरकोळ विक्रेत्याला जोरदार फटका बसत आहे. त्यामुळेच आता व्यापाऱ्यांनी ऑनलाईन ई-कॉमर्स कंपन्यांना त्याच पद्धतीने उत्तर देण्याचे ठरवले आहे. यानिमित्ताने ऑनलाईन बाजारात ग्राहकांसाठी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

भारत ई-मार्केट संपूर्णपणे पारदर्शक आणि जाबाबदारीने काम करणार आहे. हे आधुनिक तंत्रज्ञान, चांगली डिलिव्हरी, इनोव्हेटिव्ह मार्केटींग, कार्यक्षम डिजिटल पेमेंटसह तयार केले गेले आहे. याची टक्कर भारतातीलच नव्हे तर जगभरातील ई-कॉमर्स पोर्टलशी होणार आहे.

भारत ई-मार्केट हे ऑनलाईन ऍप असले तरी ते अन्य ऍपपेक्षा वेगळे आहे. कारण अन्य ऍपवर व्यापाऱ्यांना विक्रीपोटी कमिशन भरावे लागते. यामध्ये कमिशनचा समावेश नसणार आहे. त्यामुळे ग्राहकांना संबंधित वस्तू आणखी स्वस्त मिळू शकेल. ग्राहकांना विक्रेता कोण आहे याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे व्यवहार पुर्णपणे पारदर्शक होणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
१ एप्रिलपासून नवी योजना सुरू, एकदा भरलेल्या प्रीमियमवर आयुष्यभरासाठी पेन्शन; जाणून घ्या
भन्नाट ऑफर! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ऍपलचे ‘हे’ फोन्स, वाचा सविस्तर…
“कुणीही ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहणार नाही; सर्वांना मोबाईल पाठवतोय”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.