Bharat Gogavale : गेल्या चार दिवसांपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विधिमंडळाच्या बाहेर विरोधकांनी प्रचंड धुमाकूळ घातला होता.
विधिमंडळाच्या पायरीवर विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजीसह आंदोलन करत होते. मात्र, आज विधिमंडळाच्या बाहेर या आंदोलनाने टोक गाठल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली. त्यामुळे तिथले वातावरण प्रचंड तापले होते. यावेळी शिंदे गटातील नेते भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. डरपोक आहोत काय?, असे भरत गोगावले म्हणाले. तसेच आमच्या नादी लागू नका. कुणीही आमच्या अंगावर आला तर आम्ही शिंगावर घेऊ. पिक्चर अभी बाकी है! हा फक्त ट्रेलर आहे, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे.
तसेच, ते कसली धक्काबुक्की करणार आम्हीच धक्काबुक्की केली असल्याचेही ते म्हणाले. आम्हाला पाय लावायचा विचार केला तर सोडणार नाही. आमचा नाद करू नये. आमच्या मार्गात आलात तर आम्ही कुणालाच सोडणार नाही, असेही ते म्हणाले.
सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांविरोधात आंदोलन सुरु होते. यावेळी ते प्रचंड घोषणाबाजीही करत होते. हे सुरु असतानाच दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर धावून आले आणि हा वाद झाला. या प्रकारामुळे सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.
महत्वाच्या बातम्या
Raj Thackeray : ”देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून राज ठाकरे एक एक मुद्दे उकरून काढत आहेत”
Modi government : चीनला डावलून मोदी सरकारने सीमेजवळील गावासांठी घेतला मोठा निर्णय, तब्बल २५०० कोटी खर्च करून..
बकरा कापत असल्याचं स्वप्न पाहता पाहता शेतकऱ्याने स्वताचं गुप्तांग कापलं, वाचून हादराल
Aam Aadmi Party : भाजपची आपच्या आमदारांना बंपर ऑफर, भाजपमध्ये आलात तर २० कोटी, दुसऱ्याला आणलं तर..