गुड न्यूज! फायजर, सीरमनंतर आता ‘या’ कंपनीने मागितली लससाठी मंजुरी

मुंबई | देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरु आहे. अशातच सर्वांचे लक्ष कोरोना लसीकडे लागले आहे. भारतातील स्वदेशी लस निर्माता कंपनी भारत बायोटेकने केंद्र सरकारकडे लसच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे.

यामुळे आता लवकरच कोरोना लस बाजारात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच कोरोनावर लस बनवणारी भारत बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सिन लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. दोन टप्प्यातील चाचण्यांच्या डेटाच्या आधारावर भारत बायोटेकने लसीकरणासाठी मागणी केली आहे.

भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने केंद्र सरकारच्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे प्रमुख (DCGI) व्ही. जी. सोमानी यांच्याकडे लसच्या तातडीच्या वापरासाठी अर्ज केला आहे. आता हा अर्ज सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीकडे गेला आहे. ही कमिटी आता या अर्जावर विचार करेल.

‘या’ कंपनीने केंद्राकडे मागितली कोरोना लसीकरणाची परवानगी…
औषध निर्माता कंपनी फायझरने भारत सरकारकडे कंपनीने विकसित केलेल्या कोरोना लसीच्या आपत्कालीन लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे. यामुळे आता लवकरच कोरोना लस बाजारात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने दिलेल्या अर्जात देशात कोरोना लसीची आयात आणि वितरण संबंधी मंजुरी मागितली आहे. तसेच भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय़) कडे pfizer india ने रितसर अर्ज केला आहे. महत्वाची बाब म्हणजे लसीला ब्रिटन आणि बहारीनने आपत्कालीन लसीकरणाची मंजुरी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘हिंमत असेल तर बांधावर जा, शेतकरी पायातलं काढून तुम्हाला सांगतील’
‘WHO नं सांगितलं कोरोना लशीत विष मिसळा’, राष्ट्राध्यक्षांचा धक्कादायक दावा
देशात कोरोनाची दुसरी लाट? तज्ञ म्हणतात, कोरोना लसीशिवाय पर्याय नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.