लसीचा डोस घेतल्यानंतरही करोना का झाला? भारत बायोटेकने सांगितलं कारण…

मुंबई | नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच आपल्याला कोरोना लस मिळेस असे वक्तव्य केले असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष बाब ही आहे की सध्या चाचणी स्तरावर असलेली कोवॅक्सीन लस त्यांनी स्वत:ला टोचून घेतली होती.

लस घेऊनही कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. या लसीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विज यांनी ट्विट करत त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

याबाबत भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिले आहे. बायोटेकने याबाबत निवेदन दिले आहे. निवेदनात म्हंटले आहे की, ‘आमची क्लिनिकल ट्रायल ही दोन डोसवर आधारित आहे. त्यासाठी २८ दिवस द्यावे लागतात. म्हणजेच कोवॅक्सिन लसीची कार्यक्षमता ही दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनंतर निश्चित केली जाऊ शकते.”

तसेच हरयाणाचे मंत्री अनिल विज यांनी क्लिनिकल ट्रायलदरम्यान दोन आठवड्यांपूर्वी कोवॅक्सिन लसीचा एक डोस घेतला होता. त्यानंतर ते करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यानंतर सर्वत्र खळबळ उडाली असतानाच भारत बायोटेकने याबाबत असे स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान, २० नोव्हेंबरला अनिल विज यांनी ही लस स्वत:ला टोचून घेतली होती. कोवॅक्सीन लस भारत बायोटेक आणि हिंदुस्थानची वैद्यकीय संशोधन परिषद मिळून बनवत आहेत. विज यांनी या लसीच्या चाचणीसाठी लागणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये आपलेही नाव असेल असे जाहीर केले होते.

महत्त्वाच्या बातम्या
वाह अजितदादा वाह! ती शपथ विसरलात?, भाजपचा सवाल
‘मुख्यमंत्रीसुद्धा शरद पवारांचं मार्गदर्शन घेतात, कॉंग्रेसने देखील स्वीकारायला हवं’
विधान परिषदेच्या निकालावर भाष्य करताना संजय राऊतांची भाजपवर टीका, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.