पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीचा धुव्वा; भाजपच्या समाधान आवताडेंना प्रचंड मोठी आघाडी

सध्या पश्चिम बंगालवर सगळ्या लोकांचे लक्ष आहे. ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदींमध्ये कांटेंकी टक्कर होताना दिसत आहे. पंढपुरातही भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अटीतटीची लढाई होताना दिसत आहे. पंढपुर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे.

सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. नियमांप्रमाणे आधी पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या मतदारसंघाचा आकार पाहता दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. भाजपाकडून समाधान अवताडे आणि महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात सामना पाहायला मिळत आहे.

यामध्ये भाजपचे समाधान अवताडे बाजी मारताना दिसत आहेत. त्यांना पंधराव्या फेरीअखेर ३ हजार ८०० मतांची आघाडी मिळाली आहे. मदमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीत भाजपच्या समाधान अवताडेंनी ४५० मतांनी आघाडी घेतली होती.

पहिल्या फेरीत भालकेंना २ हजार ४९४ मते मिळाली होती. तर अवताडेंना २ हजार ८४४ मते  मिळाली होती. दुसऱ्या फेरीत मात्र भालकेंनी आघाडी घेतली आणि ५०० हून अधिक मतांनी ते पुढे होते. दुसऱ्या फेरीत भालकेंना ३ हजार ११२ तर अवताडेंना २ हजार ६४८ मतं मिळाली होती.

तिसऱ्या फेरीच्या अंतिम टप्प्यात भालकेंनी ६३५ मतांची आघाडी मिळवली होती. तिसऱ्या फेरीनंतर भालकेंना ८ हजार ६१३ मते मिळाली तर आवताडेंना ७ हजार ९७८ मते मिळाली आहेत. २३ व्या फेरीअखेर समाधान आवताडे हे ६८ हजार ६३४ मतांवर होते.

तर भागीरथ भालके हे ६२ हजार ९७४ मतांवर होते. म्हणजे यामध्ये समाधान आवताडे हे ५६३९ मतांनी पुढे होते. तर आता २९ व्या फेरीच्या अंतिम टप्प्यात हा फरत ९ हजार ४०० मतांचा झाला आहे. त्यामुळे समाधान आवताडे यांचा विजय होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या
पंढरपुरात राष्ट्रवादी पिछाडीवर, भाजपच्या आवताडेंनी तब्बल एवढ्या मतांनी मारली मुसंडी
आसाममध्ये भाजपकडून काँग्रेस भूईसपाट; सलग दुसऱ्यांदा भाजपने केली सत्ता काबीज
‘या’ आहेत बॉलीवूडच्या सर्वात कमी शिकलेल्या अभिनेत्री; एक तर आहे फक्त पाचवी पास
बंगालच्या वाघिनीने उडवला भाजपचा धुव्वा; ममतांच्या तृणमूलची विजयी आघाडी

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.