भारत भालकेंनी माझा ‘तो’ सल्ला मानला आणि त्यांनी विजयसिंह मोहितेंना पराभूत केले”

पंढरपूर । काल रात्री पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालकेंचे दुःखद निधन झाले. यामुळे सर्वांनी शोक व्यक्त केला आहे. ते सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. २००९ साली त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला होता.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, भारत भालके लढवय्ये नेते होते. त्यांना मी आमदारकीची निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला होता. आणि त्यांची राज्यभर चर्चा झाली, अशा अनेक आठवणी राजू शेट्टी यांनी ताज्या केल्या.

१९९२ साली ते राजकारण सक्रिय झाले. कारखान्याचे संचालक पदापासून त्यांनी राजकारण केले. नंतर ते अध्यक्ष झाले. २००४ साली त्यांनी विधानसभा लढवली मात्र त्यांचा पराभव झाला. मात्र त्यांनी २००९ साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली.

राजू शेट्टी यांनी आग्रह करून त्यांना तिकीट दिले आणि त्यांनी राज्याचे मोठे नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला. आणि ते राज्यभरात गाजले.

ते सामान्य कुटुंबातील व्यक्ती होते. अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता. २००९ पासून सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी २०१९ ला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. आणि ते निवडणूक देखील आले होते.

त्यांनी मोठ्या संघर्षाने मोठे स्थान निर्माण केले होते. आता राजकारणातील राजहंस हरपला, असा झुंझार नेता होणे नाही, अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी भारत नानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.