हिंमत असेल तर २०२४ ला लढा, कोण दंड थोपटतय दाखवतो; भालकेंचे परीचारकांना थेट आव्हान

पंढरपुर |  राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुर मंगळवेढा विधानसभेत पोटनिवडणूक लागली होती. यामध्ये अटीतटीच्या लढतीत भाजपने राष्ट्रवादीवर विजय मिळवला आहे.

भाजपचे समाधान अवताडे आणि महाविकास आघाडीचे भगीरथ भालके यांच्यात  सामना पाहायला मिळाला. भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा ३००० पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.

निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युध्द चांगलच रंगलं आहे. आमदार समाधान अवताडे, भाजप नेते प्रशांत परिचारक, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

पराभूत झालेले भगीरथ भालके यांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे. भालके म्हणाले, “कालच्या पोटनिवडणूकीत १,५,७३३ मतदारांनी माझ्या पारड्यात मतं टाकली आहेत. नानांपेक्षा जास्त प्रेम मला पंढरपुर मंगळवेढ्यातील जनतेने दिलं आहे. त्याबद्दल मी माझ्या सहकाऱ्यांचे, मतदारांचे मनापासून आभार मानतो”.

पुढे म्हणाले, “पराभूत झालो असलो तरीही मी सर्वसामान्यांच्या हाकेला धावून येईल. निवडणूकीच्या प्रचारामध्ये माझ्या कुटूंबावर आणि नानांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली. भाजप उमेदवाराच्या विजयानंतर भाजप नेते प्रंशात परिचारक यांनी दंड थोपटले आणि पराभवाचा बदला घेतला असं म्हणाले आहेत”.

“हिंमत असेल तर २०२४ च्या निवडणूकांमध्ये रिगंणात या, आपण एकमेकांसमोर लढू. त्यावेळी कोण दंड थोपटतंय दाखवतो”. असं म्हणतं भगीरथ भालके यांनी प्रशांत परिचारक यांना थेट आव्हान दिले आहे.

दरम्यान  भगीरथ भालके यांच्या पराभवानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का  बसला आहे. भगीरथ भालके यांचे वडील भारत भालके  एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा पंढरपुर मंगळवेढा विधानसभेवर निवडून गेले होते.
महत्वाच्या बातम्या-
बंगालमध्ये भाजप हारली, मात्र या महिला आमदाराची देशात होतेय चर्चा
मोठी बातमी! प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा राजकारणातून संन्यास; कारण..
निकाल मोठ्या मनाने स्विकारायला हवा पण भाजप रडीचा डाव खेळतय; ममतांच्या पराभवावर पवार संतापले

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.