Bhaiya Gaikwad : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) घडलेल्या एका थरारक प्रकारामुळे ‘रिल स्टार’ आणि किंगमेकर ग्रुपचा अध्यक्ष भैय्या गायकवाड (Bhaiya Gaikwad) पुन्हा चर्चेत आला आहे. समृद्धी महामार्गावरील सावंगी टोलनाक्यावर (Savagni Toll Plaza) टोल भरण्याच्या वादातून भैय्याला टोल कर्मचाऱ्यांनी चांगलीच मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, “व्हिडीओ डिलीट कर” अशा आरोळ्या ऐकू येत आहेत.
टोलनाक्यावर वाद, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, भैय्या गायकवाडची गाडी टोलनाक्यावर पोहोचली तेव्हा फास्टटॅग (Fastag) नसल्यामुळे टोल भरण्याचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी त्याने कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागून शिवीगाळ केली. त्यामुळे संतापलेल्या टोल कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. काहींनी ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद केली आणि तो व्हिडिओ क्षणात व्हायरल झाला.
‘रिल स्टार’ची अरेरावी उलटी पडली
भैय्या गायकवाड हा सोशल मीडियावर “हॅलो, भैय्या गायकवाड बोलतोय” या डायलॉगमुळे प्रसिद्ध आहे. नेहमी डोक्यावर कुंकाची तीन बोटं, गळ्यात सोन्याची साखळी आणि स्पीकरवर मोबाईल ठेवून स्टाईलमध्ये बोलणारा हा ‘रिल स्टार’ टोलनाक्यावर मात्र स्वतःच्या अरेरावीचा फटका बसवून घेतो. टोल कर्मचाऱ्यांशी वाद वाढताच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि गायकवाडला धक्काबुक्की करत मारहाण झाली.
सिल्लोड भेटीनंतर परतीच्या प्रवासात घडली घटना
माहितीनुसार, भैय्या गायकवाड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात (Sillod Taluka) उपोषणकर्ते मंगेश साबळे (Mangesh Sable) यांची भेट घेण्यासाठी आला होता. भेट संपवून तो नाशिककडे (Nashik City) परत जात असताना सावंगी टोलनाक्यावर हा प्रकार घडला. त्याच्या उद्धट वर्तनाने टोल कर्मचाऱ्यांनी संयम सोडला आणि त्यानंतर त्याला चोप दिला.
सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ट्रोलर्सनी भैय्या गायकवाडवर सडकून टीका केली आहे. काहींनी त्याच्या पूर्वीच्या रील्सची खिल्ली उडवत त्याच्या ‘रिअॅलिटी शो’ची चेष्टा केली. घटनेनंतर स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता असून, प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आह






