‘पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कोणत्या आधारावर वर्ग केली?’

मुंबई : पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील कमालीचे आक्रमक झालेत.

दरम्यान, फडणवीसांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. ‘मुंबई पोलिसांची खाती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती. याचं उत्तर द्यावं’, असा सवाल भाई जगताप यांनी उपस्थित केला.

याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘फडणवीस यांना सवाल आहे की त्यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली याचं उत्तर द्यावं. फडणवीस यांनी तब्बल २१ जणांना त्यांच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लीनचिट दिली आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत काय बोलणार?,’

दरम्यान, त्यावरुन आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत ट्विट करत अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांना इशारा दिला आहे. ‘लक्षात ठेव, सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही,’ असे त्यांनी म्हंटले आहे.

“ए भाई, तू जो कोण असशील, माझ्यावर बोट उचलायचं नाही. पोलिसांची खाती राज्यात यूटीआय बँक/अ‍ॅक्सिस बँकेला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही!” अशा आशयाचं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांना इशारा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

वडील वारले, आईने स्वत:ला जाळून घेतले, तरीही न खचता तो झाला पोलिस अधिकारी

लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून ‘अशी’ शेती केली सुरु, आता ती करतेय करोडोंची कमाई

नाद खुळा! कोरोनातून बरं झाल्यानंतर पुण्यातल्या ‘या’ वाघाने केले तब्बल ९ वेळा प्लाझ्मा दान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.