पंजाब सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले विजय सिंगला यांना एंटी करप्शन विभागाच्या ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही आपल्याच सरकारमध्ये असलेल्या मंत्री विजय सिंगला मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. पंजाबच्या भगवंत मान सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले विजय सिंग हे अचानक एंटी करप्शन विभागाच्या ताब्यात आले आहेत.(Punjab Government, Health Minister, Vijay Singla, Chief Minister, Bhagwant Mann, Anti Corruption, Corruption)
काही तासांपूर्वी पंजाब सरकारमध्ये आरोग्यासारख्या महत्त्वाच्या खात्याचे मंत्री असलेले विजय सिंग यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातून बर्खास्त केले होते. त्यानंतर काही वेळातच एंटी करप्शन विभागानेही कारवाई केली. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सूचनेवरून एसीबीने विजय सिंग याला अटक केली आहे.
विजय सिंगला यांनी अधिकाऱ्यांकडून कंत्राटावर एक टक्का कमिशन मागितल्याच्या आणि भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. विजय सिंगला यांच्या भ्रष्टाचारात गुंतल्याच्या आरोपाबाबत सबळ पुरावे मिळाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
आम आदमी पार्टी का जन्म ईमानदार सिस्टम कायम करने के लिए हुआ है…@ArvindKejriwal जी ने हमेशा कहा है कि भ्रष्टाचार को बर्दाश्त नहीं करेंगे चाहे कोई अपना हो या बेगाना
स्वास्थ्य मंत्री के खिलाफ भ्रष्टाचार के सबूत मिलते ही तुरंत बर्खास्त किया…साथ ही FIR के आदेश दिए pic.twitter.com/0g9nqGteHb
— Bhagwant Mann (@BhagwantMann) May 24, 2022
विजय सिंगला यांना मंत्रिमंडळातून बर्खास्त केल्याची घोषणा करताना सीएम मान यांनी पंजाब पोलिसांना सिंगला यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे निर्देशही दिले होते. विजय सिंगला यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्याची घोषणा करताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक टक्काही भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले.
सीएम मान म्हणाले की, लोकांनी मोठ्या आपेक्षेने आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन केले आहे. त्या आपेक्षेप्रमाणे जगणे हे आपले कर्तव्य आहे. जोपर्यंत अरविंद केजरीवाल सारखे भारतमातेचे सुपुत्र आणि भगवंत मान सारखे सैनिक आहेत, तोपर्यंत भ्रष्टाचाराविरुद्धचे महायुद्ध सुरूच राहील.
ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराची व्यवस्था उखडून टाकण्याची शपथ घेतली होती. आम्ही सर्व त्यांचे सैनिक आहोत, असे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इथे एक टक्काही भ्रष्टाचाराला थारा नाही. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्याच मंत्र्याला बर्खास्त करण्याची ही कारवाई भ्रष्टाचारात गुंतलेल्या इतर नेत्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठीही कडक संदेश म्हणून पाहिली जात आहे.
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आपल्याच मंत्र्याला बर्खास्त करण्याची पंजाबमधील ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षाने भ्रष्टाचारावरून सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. व्यवस्थेतील खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्याची आश्वासने पक्षाने दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
‘राजा’ने कर्तृत्ववान सरदारांचा सन्मान राखला पाहिजे; वसंत मोरेंनी पोस्ट केलेल्या पत्राने चर्चांना उधान
सलग दोन वर्षे अर्जून तेंडूलकर संघाबाहेर; अखेर सचिनने मौन सोडत दिली प्रतिक्रीया, म्हणाला..
डॉक्टर ते जगप्रसिद्ध गीतकार..ज्यांच्या गाण्यामुळे पंतप्रधान नेहरूंनी त्यांना तुरूंगात टाकले होते; वाचा त्या गीतकाराबद्दल..
‘या’ ठिकाणी मुलगी मोठी झाल्यावर बापाचे तिच्यासोबत लावून दिले जाते लग्न, वाचा विचित्र प्रथेबद्दल..