Homeताज्या बातम्याभरमसाठ होमलोन घेण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणे फायद्याचे; हप्त्याच्या पैशात येतील 2-3 घरे

भरमसाठ होमलोन घेण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणे फायद्याचे; हप्त्याच्या पैशात येतील 2-3 घरे

स्वत:च घर असावं असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक खूप मेहनत करतात. काही लोक घर बांधण्यासाठी बँकेकडून कर्ज देखील घेतात. काही लोकं मात्र कर्ज न घेता भाड्याच्या घरामध्ये राहणे पसंत करतात. सध्या कोरोनामुळे दिल्ली-एनसीआर, मुंबईसह देशातील अनेक महानगरांमध्ये भाडे कमी झाल्याच्या बातम्याही येत आहेत.

जेव्हा तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करता, तेव्हा तुमच्या मनात गृहकर्जावरील व्याजाचा भार याचा प्रश्न येतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत आपल्या स्वतःचे घर घ्यावे की भाड्याने घर घेऊन राहावे, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. जेव्हा तुम्ही गृहकर्ज घेऊन घर खरेदी करता तेव्हा तुम्हाला त्या कर्जाची परतफेड करावी लागते.

घर विकत घेण्याचा किंवा भाड्याने घेण्याचा निर्णय तुम्ही कसा घ्याल? यासाठी तुम्हाला आधी दोन्ही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत. जर तुम्हाला भाड्याने घर घेतले तर तुम्हाला दर महिन्याला १२ हजार ते १४ हजार भाडे द्यावे लागेल. हा खर्च ११ महिन्यांनंतर वाढेल. भाड्याचे हे घर टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला दर वर्षाला ५ ते १० टक्क्यांची वाढ घरमालकाला द्यावी लागेल. यादरम्यान तुमचा पगार देखील वाढत राहील, पण महागाईचा दरही वाढत राहील.

तुम्ही स्वतःचे घर खरेदी केले, तर तुम्हाला गृहकर्ज घ्यावे लागेल. त्यामध्ये तुम्हाला २० टक्के डाउन पेमेंट करावे लागेल. म्हणजेच तुम्हाला घराच्या एकूण किंमतीपैकी ८० टक्के रक्कम गृहकर्जात तुम्हाला मिळेल. यामध्ये तुम्हाला ७.५ टक्के व्याजदराने २० वर्षांसाठी ३२,००० रुपयांचा EMI भरावा लागेल.

तुम्हाला जे घर आता ५० लाख रुपयांना मिळत आहे ते २० वर्षांनंतर सुमारे १.१५ कोटी रुपयांमध्ये मिळेल. याशिवाय आज एखादे घर विकत घेतले तर २० वर्षे घराच्या देखभालीचा खर्च अनेक प्रकारचा असतो. जर तुम्ही गृहकर्ज न घेता त्या पैशांची कुठेतरी गुंतवणूक केली, तर २० वर्षांनंतर तुमच्याकडे १५ टक्क्यांच्या परताव्यानुसार सुमारे ४ कोटी रुपये असू शकतात.

भाड्याच्या घरात राहताना तुम्ही जर हुशारीने गुंतवणूक केली तर तुम्हाला काही वर्षानंतर खूप चांगल्या रकमेचा परतावा मिळेल. हे नवीन घर घेण्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक फायदेशीर ठरू शकते. २० वर्षांनंतर, तुम्ही त्याच घराची खरेदी करून नफ्यात राहू शकता. स्वतःचे घर खरेदी करून देखील तुमच्याकडे मोठी रक्कम शिल्लक राहू शकते. या रकमेमध्ये तुम्ही आणखी दोन-तीन घरे खरेदी करू शकता.

महत्वाच्या बातम्या :-
मराठी अभिनेत्याला काढले मालिकेतून बाहेर; राजकीय भूमिका घेणे पडले महागात…
भाजपला राम राम ठोकलेल्या ३ मंत्र्यांचं आणि ९ आमदारांचं अखेर ठरलं, ‘या’ पक्षात करणार प्रवेश
“इंदुरीकरांवर कारवाई करा, अन्यथा अंधश्रद्धा पसरविण्यात ठाकरे सरकार सुद्धा सामील असे वाटेल”