Share

अविस्मरणीय! पुरूषही तोंडात बोटं घालतील अशी फिल्डिंग केली ‘या’ महिला क्रिकेटपटूंनी, पहा व्हिडीओ

Cricket-

आयसीसी(ICC) महिला वर्ल्ड कप(World Cup) क्रिकेट स्पर्धेतील न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सामन्यात उत्कृष्ट फिल्डिंग पाहायला मिळाली. या सामन्यात तीन महिला क्रिकेटपटूंनी आपल्या संघासाठी उत्तम फिल्डिंग केली. मैदानावर उपस्थित असलेले प्रेक्षक देखील त्यांच्या कामगिरीने आश्चर्यचकित झाले. या सामन्यात दोन महिला क्रिकेटपटूंनी अप्रतिम झेल घेतले.(best fielding by women cricketers in aus vs nz match)

तसेच एका महिला क्रिकेटपटूने कमालीचा रनआउट केला आहे. या तिन्ही महिला क्रिकेटपटूंचे खूप कौतुक होत आहे. ऑस्ट्रलियाच्या डावात ४५ व्या षटकात न्यूझीलंडच्या मॅडी ग्रीनने सुंदर झेल घेतला आहे. न्यूझीलंडच्या मकायने शेवटच्या षटकात एका हाताने थ्रो करत सुंदर रनआउट केले आहे. न्यूझीलंडचा संघ फलंदाजी करत असताना सहाव्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने अप्रतिम झेल घेतला आहे.

फलंदाजी करत असताना शेवटच्या षटकात न्यूझीलंडच्या फ्रान्सिस मकायने ऑस्ट्रेलियाच्या अमांडा जेडला रनआउट केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या अमांडा जेड ५० व्या षटकात चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी न्यूझीलंडच्या फ्रान्सिस मकायने धावत येत एका हाताने थ्रो केला आणि ऑस्ट्रेलियाच्या अमांडा जेडला धावबाद केले.

ऑस्ट्रलियाच्या डावात ४५ व्या षटकात न्यूझीलंडच्या मॅडी ग्रीनने जबरदस्त झेल घेतला. ऑस्ट्रलियन खेळाडू एलिसा पेरी ६८ धावांवर खेळत असताना ताहुहूच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारला. पण त्यावेळी न्यूझीलंडच्या मॅडी ग्रीनने अप्रतिम झेल घेतला. हा झेल पाहून मैदानातील प्रेक्षक अवाक झाले. या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंनी उत्तम क्षेत्ररक्षण केले.

ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने सहाव्या षटकात अप्रतिम झेल घेतला. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने न्यूझीलंडच्या एमिलीयाचा स्लिपमध्ये उत्कृष्ट झेल घेतला. या झेलमुळे न्यूझीलंडच्या एमिलीयाला मैदानाबाहेर जावं लागलं. या तिन्ही खेळाडूंच्या कामगिरीचे व्हिडिओ आयसीसीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

या तीन व्हिडिओच्या शेवटी आयसीसीने ‘व्हॉट अ कॅच’ आणि ‘तिने असं कसं केलं’ आणि ‘अप्रतिम कॅच बाय बेथ मुनी’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर या खेळाडूंचे फार कौतुक होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय झाला आहे. ऑस्ट्रेलियाने १४१ धावांनी न्यूझीलंडवर विजय संपादित केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
तेव्हा जावेद अख्तर श्रेयाला म्हणाले, उपरवालेने आपको बनाना शुरू किया, पहले विद्या बालन से शुरू किया..
काय सांगता? मारूती Alto पेक्षा Ertiga स्वस्त, ग्राहकांमध्ये गाडी घेण्यासाठी स्पर्धा, होळीपुर्वी मेगा सेल
VIDEO: ‘तु विद्या बालनसारखी दिसतेस’, अक्षय कुमारने श्रेया बुगडेला दिले खास गिफ्ट, श्रेयाही झाली अवाक

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now