ओव्याचे आणि जिऱ्याचे पाणी पिल्याने होतील हे आश्चर्यकारक फायदे; वाचा…

वजन वाढल्याने अनक लोकांना अस्वस्थ वाटते, त्यामुळे अनेक लोकांना आपण चांगले स्लिम असावे, असे वाटते. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करत असतात, जिम जॉईन करतात. पण अनेकदा त्याने फायदा होत नाही.

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक खास पेयाबद्दल सांगणार आहोत, ज्याने तुम्हाला तुमचे वजन कमी करण्यास मदत होईल. इतकेच नाही, तर या पेयामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ति वाढण्यास पण मदत होते. हे पेय म्हणजे ओवा जिऱ्याचे पाणी.

एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचे जीरा पावडर मिसळा आणि रिकाम्या पोटी प्या. जिऱ्यात फक्त अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मच नाही, तर अँटी ऑक्सिडंट्सचा एक उत्कृष्ठ स्त्रोत देखील आहे.

दीर्घकाळापासून लठ्ठपणामुळे होणारी जळजळ हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित रोगांशी जोडली गेलेली असते. त्यामुळे शरीराला बाकीच्याही समस्या उद्धभवत असतात. या सर्व गोष्टींसाठी जिऱ्याचे पाणी खुप फायदेशीर असते. जिऱ्यात लोह, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस, आणि इतर अनेक घटक असतात. जे युरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

ओव्याचे पाणी हे पोट कमीकरण्यासाठी उपयुक्त असते. एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा घालून ते पाणी उकळा. ते पाणी कोमट करुन रोज पिल्याने तुम्हाला पोट कमी करण्यासाठी फायद्याचे ठरते. तुमची इच्छा असेल, तर तुम्ही हे मोठ्या प्रमाणात हे पाणी उकळून एका भांड्यात ठेऊ शकतात.

तुम्ही दिवसभरात कधीही हे पाणी पिऊ शकतात. असे केल्याने लवकरच तुम्हाला त्याचे फायदे दिसून येतील. जर तुम्हाला दिवभरात हे पाणी पिण्यासाठी वेळ भेटत नसेल, तर तुम्ही सकाळी रिकाम्यापोटी हे पाणी पिऊ शकतात.

जिऱ्याचे पाणी कोलेस्ट्रोलची पातळी कमी करण्यासाठी एक चांगले पेय आहे. तसेच लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि फ्लॅटपोट मिळवण्यासाठी जिऱ्याचे पाणी फायदेशीर ठरते.

महत्वाच्या बातम्या-

सुजय विखे यांची न्यायालयाने केली कान उघडणी; मतदारसंघात रेमडीसिवीर आणल्याचे प्रकरण भोवणार
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय घेणार घटस्फोट? अभिषेकने केला ‘हा’ मोठा खुलासा
एखाद्या चित्रपटाच्या फिल्मी स्टोरीप्रमाणे ‘या’ अभिनेत्याचे कुटुंब एका रात्रीत संपले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.