टोल नाक्यावर गेल्यावर नुसता टोल भरू नका त्याचे फायदेही जाणून घ्या

तुम्ही कोणत्याही लांबच्या प्रवासाला निघाला की तुम्हाला टोल भरावा लागतो. प्रत्येक हायवेला तुम्हाला टोल भरावा लागतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की टोल नाक्यावर टोल भरल्यानंतर या टोलचा वापर कोठे होतो.

एक्सप्रेस हायवेवरून जाताना टोलची संख्या कमी असते. पण टोलचा दर हा खुप जास्त असतो. हा दर गाडीचा आकार, वजन, एक्सेलची संख्या पाहून ठरवला जातो. त्यामुळे टोलनाक्यावर गेल्यावर आपल्याला वाहनानुसार वेगवेगळ्या रांगा पाहायला मिळतात.

तुमच्या माहितीसाठी बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर या पद्धतीने राज्य किंवा केंद्र सरकारकडून रोड बांधकामाची कामे दिली जातात. कामे पुर्ण झाल्यानंतर टोलच्या माध्यामातून त्यांना पैसे मिळत असतात. बांधकामाला लागणारा खर्च वसूल झाल्यानंतर टोलचा दर आधीच्यापेक्षा ४० टक्के ठेवला जातो.

हा टोल रोडची निगा राखण्यासाठी असतो. आता या पद्धतीला आणखी वेग मिळाला आहे. कारण आता फास्टॅगमुळे या प्रक्रियेला आणखी गती मिळाली आहे. त्यामुळे टोल भरणाऱ्या वाहनांना जास्तवेळ वाट पाहावी लागत नाही.

परदेशात कित्येक वर्षांपासून फास्टॅग वापरले जाते पण भारतात ही प्रणाली आता आली आहे. तुम्हाला टोल भरल्यानंतर एक पावती दिली जाते. पण या पावतीचे फायदे खुप कमी जणांना माहिती आहेत. ही पावती का जपून ठेवली पाहिजे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

टोल भरलेल्या रस्त्यावरून जाताना जर तुमची गाडी बंद पडली तर तुमच्या गाडीला टो अवे करून घेऊन जाण्याची जबाबदारी टोल घेणाऱ्या कंपनीची असते. तसेच जर तुमच्या गाडीतील पेट्रोल संपले किंवा बॅटरी डेड झाली तर अशावेळी तुम्ही जिथे आहात तिथे येऊन पेट्रोल किंवा एक्स्टर्नल चार्जिंग देण्याची जबाबदारी टोल घेणाऱ्या कंपनीची असते.

जर कधी तुमच्यासोबत असे झाले तर गाडी रस्त्याच्या साईडला लावावी आणि टोल पावतीवर असणाऱ्या फोननंबरवर फोन करून तुम्ही मदत मागू शकता. दहा मिनिटांत तुम्हाला मदत मिळू शकते. गाडी पंक्चर झाली तरी तुम्ही मदत मागू शकता.

तुमच्या गाडीचा अपघात झाला तरीही फोन करू शकता. जर गाडीतील एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक बिघडली तरीही त्या व्यक्तीला तातडीने मदत देण्याची जबाबदारी टोल कंपन्यांची असते. मात्र याचा कोणी गैरवापर करू नये याची काळजी घ्यावी.

खरंच मदत मिळते का हे पाहण्यासाठी फक्त फोन करणे चुकीचे आहे. हायवेच्या टोलनाक्याजवळ स्वच्छतागृहाची सोय करून देणे, पिण्याच्या पाण्याची सोय करून देणे हे बंधनकारक आहे. तसं नसल्यास तुम्ही रितसर तक्रार करू शकता. ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.