रोज ग्लासभर कोमट दुधात एक गुळाचा खडा टाकून पिल्याचे फायदे वाचाल तर रोज प्याल

आज आम्ही तुम्हाला दुधात गुळाचा खडा टाकून पिल्याचे फायदे सांगणार आहोत. कोमट दुध आणि गुळ याचे बरेच फायदे आहेत. याचा नियमित वापर केल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. पण दुध कोमटच असले पाहिजे.

थंड दुधात गुळाचा खडा टाकून पिऊ नये. गाईच्या दुधासह गुळाचे दुध पिणे चांगले आहे. रात्री झोपायच्या आधी तुम्ही याचे सेवन करू शकता. गुळातील २५ ते ३० ग्रॅमचा टुकडा ३०० मिली कोमट दुधात टाका आणि ते दुध गरम असतानाच प्या.

कोमट दुध आणि गुळाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. गायीच्या दुधा फॅट कमी असते यामुळे शरीरातील मेटोबॉलिसम बुस्ट होते. गुळ हा पोटातील आतड्या स्वच्छ करण्यास मदत करतो. म्हणून रात्री कोमट दुधात गुळ टाकून प्यायल्याने सकाळी पोट पुर्णपणे साफ होते.

हे रोज प्यायल्याने पाचनक्रिया सुरळीत होते आणि पोटावरील अतिरीक्त चरबी जमा होत नाही. कोमट दुध आणि गुळ खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. गुळामध्ये पित्तशामक गुण असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते आणि रक्त अशुद्ध होत नाही.

तसेच यामुळे शरीराला ऍन्टीऑक्सीडंट्सची कमतरता भासत नाही. रक्तातील परजीबी दूर करण्यासाठी हे खुप फायदेशीर आहे. दुधामध्ये कॅल्शीयम असते तर त्यामध्ये गुळ घातला तर हे अमृतापेक्षा कमी नाही. कॅल्शियम आपल्या शरीरासाठी किती महत्वाचे आहे हे तुम्हाला माहितच आहे.

कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत राहतात. बऱ्याच जणांची समस्या असते की त्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते. दूध आणि गुळाचा वापर केल्याने ही समस्या दूर होऊ शकते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्त्रियांनी याचा वापर केला तर त्यांना नक्कीच आराम मिळतो.

महत्वाच्या बातम्या
धक्कादायक! एकाच चितेवर आठ जणांवर अंत्यसंस्कार, बीड जिल्ह्यातील भीतीदायक घटना
सलूनमध्ये गाणे ऐकताना भावाला आली गर्लफ्रेंडची आठवण, रडून रडून झाला बेहाल, पहा व्हिडीओ
दिलबर गर्ल नोरा फतेहीचा नवीन लुक; फोटो पाहून चाहते झाले आनंदी
‘परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्या वाढतीये’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.