लहान मुलांना गुणकारी ओवा; प्रत्येक पालकाला माहीत असले पाहिजेत ओवा खाण्याचे ‘हे’ फायदे

बऱ्याचवेळा असं होतं की, आपल्या पोटात खूप दुखत असते आणि आपली आजी आपल्याला ओवा खाण्याचा सल्ला देते. प्रत्येकाला हे आठवत असेल. पोटाच्या कोणत्याही समस्या जाणवू लागल्या की आपल्याला ओवा खाण्याचा सल्ला दिला जातो.

ओवा खाल्यानंतर पोटाच्या दुखण्याला तात्पुरता आराम मिळतो. ओवा स्वयंपाकघरात मसाल्याच्या रुपात वापरला जातो. बंगाल, पंजाब, दक्षिण भारत या प्रांतात त्याच सर्वाधिक उत्पादन आहे. आयुर्वेदात ओव्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. ओवा शंभर प्रकारचे धान्य पचवण्यासाठी फायदेशीर आहे.

ओव्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. लहान मुलांना पोटाच्या अनेक समस्या असतात त्यांच्यासाठी ओवा गुणकारी आहे. मुलांना बऱ्याचदा पोटातील कृमीचा त्रास असतो. यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे मुलांना गोड पदार्थ खूप आवडतात. जास्त गोड खाण्याने त्यांच्या पोटात कृमी तयार होतात.

मुलांच्या पोटातील कृमी दूर करण्यासाठी त्यांना दिवसातून ३ वेळ सलग पाव चमचा खारट ओवा खायला द्या तसेच झोपताना त्यांना चार ते पाच थेंब ओव्याचे तेल पाजा. त्यामुळे जंतांचा नाश होतो. लहान मुलांना माती खाण्याची खूप सवय असते.

त्यांना माती खाण्यापासून थांबवणं त्यांची ही सवय मोडणे खूप कठीण काम आहे. मात्र त्यांना ओवा खाऊ घातल्याने ही सवय मोडू शकते. यासाठी त्यांना दररोज झोपायच्या आधी एक चमचा ओव्याचे चूर्ण खायला द्या. काही दिवसांनी त्यांची सवय मोडून जाईल. मोठ्यांसाठीसुद्धा हा उपाय गुणकारी आहे.

मुलांमध्ये पोटदुखी हा किरकोळ प्रकार झाला आहे. त्यांना सारखा पोटदुखीचा त्रास होतो. एक ग्रॅम काळे मीठ आणि दोन ग्रॅम ओवा कोमट पाण्यातून पाजा. ज्याला पोटदुखीचा त्रास असेल त्यानेसुद्धा हा उपाय केला तरी चालेल.

खोकल्याच्या समस्येवर ओवा खूप गुणकारी आहे. खोकला झाल्यास एक चमचा ओवा चघळून खा आणि वरून गरम पाणी प्या. रात्री खूप खोकला येत असला तर सुपारीच्या पानात अर्धा चमचा ओवा टाका आणि चघळून त्याचा रस प्या. यामुळे खोकला बरा होतो.

बऱ्याच लहान मुलांना हथरुणात लघवी करायची सवय असते. काहीजणांची तर मोठे झाले तरी ही सवय लवकर जात नाही. त्यासाठी रात्री झोपताना त्यांना रोज एक चमचा ओव्याचे चूर्ण द्या. काही दिवसांनी ही सवय नाहीशी होईल. हे होते ओव्याचे फायदे. आवडलं तर शेअर करायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या; डॉ.अमोल कोल्हे यांनी वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर अभिनय क्षेत्रात कसा प्रवेश केला

गुड न्युज! टुरीस्ट गाड्यांचा ६ महिन्यांचा वाहन कर मोदी सरकारने केला माफ

सुशांत केसमध्ये सुशांतच्या बहीणीचीही चौकशी करणार एनसीबी; तपासाला पुन्हा टर्न

सुशांतचे दाजी झाले भावूक! सांगितला सुशांतबद्दलचा ‘तो’ किस्सा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.