गुळ – फुटाने खाण्याचा सल्ला डाॅक्टर उगाच नाही देत; फायदे ऐकाल तर चकीत व्हाल

मुंबई | अनेक वेळा डाॅक्टर आपल्याला गुळ, फुटाणे खाण्याचा सल्ला देत असतात. याचबरोबर काही जण नियमित गुळ, फुटाणे खातात देखील माञ त्यांना याचे फायदे माहिती नसतात. परंतु हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असल्याचे सर्वांनाच माहीती आहे.

तर आज आपण गुळ, फुटाणे खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. गुळ हा लोहाचा मुख्य स्ञोत आहे. यामुळे अशक्तपणा असणाऱ्या व्यक्तींसाठी गुळ खुप फायदेशीर आहे. तसेच अशक्तपणा जाणवत असल्यास फुटाणे व गुळ सेवन केल्यास तुमची उर्जा पातळी वाढण्यास मदत होईल.

याचबरोबर गुळ आणि फुटाणे एकञ खाल्लाने पचन प्रक्रिया व्यवस्थित राहते. गूळ शरीराचे रक्त स्वच्छ करतो यामुळे गॅसची समस्या उद्भवत नाही. ज्यांना गॅसचा त्रास होतो, त्यांनी दररोज जेवणानंतर थोडासा गूळ आणि फुटाणे नक्की खावेत. यामुळे आराम मिळेल.

दरम्यान, गूळ आणि फुटाणे मध्ये पोटॅशियम आढळते जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. याचबरोबर यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही कमी होते. गूळ लवकर पचतो आणि साखरेची पातळी देखील वाढत नाही.

तसेच तुम्हाला जर वजन कमी करायचे असल्यास गुळाचे सेवन करणे अधिक फायदेशीर आहे. लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेल्या पुरुषांनी नियमितपणे फुटाणे आणि गूळ खाण्यास सुरुवात करावी. हे शरीराची चयापचय वाढवते याचबरोबर लठ्ठपणा कमी करण्यात मदत करते.

 

महत्त्वाच्या बातम्या
हेमामालिनीने एक चुगलीमुळे धर्मेंद्रने गोविंदाच्या कानाखाली वाजवली होती; जाणून घ्या पुर्ण किस्सा..
एखाद्या चित्रपटाच्या फिल्मी स्टोरीप्रमाणे ‘या’ अभिनेत्याचे कुटुंब एका रात्रीत संपले
म्हणून शक्तीमान मुकेश खन्नांनी अजूनही नाही केले लग्न! सांगीतले धक्कादायक कारण
फेमस काॅमेडीयन राजू श्रीवास्तवला काम मिळणेही बंद झाले यामागे आहे हे धक्कादायक कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.