सुकलेला लसूण फेकून देताय? थांबा, आधी त्याचे गुणकारी फायदे वाचा

लसूण हा आपल्या दैनंदिन आहारातील महत्त्वाचा घटक आहे. आपल्या आरोग्यासाठी लसूण हा खुप फायदेशीर आहे. पण अनेक जण लसूण खाण्यासाठी टाळाटाळ करतात. आयुर्वेदातसुद्धा लसणाचे अनेक फायदे सांगितले आहेत.

पण खुप लोकांना वाळलेल्या म्हणजे काळ्या लसणाचे फायदे माहीत नाहीत. तुम्हाला माहीत नसेल पण सुकलेल्या लसणाचे अनेक चमत्कारी फायदे आहेत. अनेकवेळा लसूण सुकला म्हणून आपण फेकून देतो.

पण सुकलेल्या लसणाचे फायदे वाचाल तर लसूण फेकूण देताना तुम्ही दहा वेळा विचार कराल. चला तर मग जाणून घेऊया सुकलेल्या लसणाचे फायदे. काळा लसुण म्हणजेच सुकलेला लसुण हा ब्लड सर्क्युलेशनसाठी खुप फायदेशीर असतो.

याचे सेवण केल्याने कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो. तसेच काळ्या लसणाने आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. खोकला, सर्दी आणि ताप यावर रामबाण उपाय म्हणजे काळा लसुण. ह्रद्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काळा लसूण फायदेशीर आहे.

अनेक लोकांना डायबेटीजचा त्रास असतो त्यासाठी काळा लसूण अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे साखर नियंत्रणात राहते. काळ्या लसणामुळे बॅक्टेरीया आणि फंगसमुळे काही आजार उद्भवतात.

या आजारांपासून बचाव करण्यासाठी काळा लसूण चांगला उपाय आहे. कारण त्यामध्ये Antibacterial, Antiviral, Antifungal प्रॉपरटीज असतात. तसेच काळ्या लसणामध्ये फर्मनटेशनमुळे Antioxidants तयार होतात, ते फक्त लसणात आढळतात.

पॉलिफिनॉल्स, फ्लेवोनॉईड्स आणि अल्केलॉईड्स भरपूर प्रमाणात असतात. हे सगळे गुणधर्म कॅन्सरवर प्रभावी असतात. यामुळे ऍलर्जी दूर होते. पचनक्रिया सुधारते. लिव्हर डॅमेज होण्यापासून वाचते. असे अनेक गुणकारी आणि आरोग्यदायक फायदे काळ्या लसणामुळे होतात.

महत्वाच्या बातम्या
त्वचेच्या कोणत्याही प्राॅब्लेम्सवर नामी उपाय आहे खोबरेल तेल; पहा काय काय फायदे आहेत..
एका मळक्या कपड्यातील शेतकऱ्यानं अख्ख पोलीस स्टेशन सस्पेंड केलं होतं; वाचा पुर्ण किस्सा
राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खुद्द एकनाथ खडसेंनी सोडले मौन, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.