त्वचेच्या कोणत्याही प्राॅब्लेम्सवर नामी उपाय आहे खोबरेल तेल; पहा काय काय फायदे आहेत..

अनेकांना त्वचेच्या खुप गंभीर समस्या असतात. काही लोकांना ऍलर्जी असते. तर काही जणांची त्वचा खुप कोरडी असते. म्हणून आपण आपल्या त्वचेची खुप जास्त काळजी घेत असतो. त्वचेला जपण्यासाठी आपण कितीतरी गोष्टी करत असतो.

खास त्वचेच्या डॉक्टरांकडे जाऊन आपण उपचार घेतो. अनेक प्रकारच्या क्रिम आणि फेसवॉश वापरतो. पण तरीही आपल्या त्वचेला फरक पडत नाही. यावर आपण घरगुती उपाय करू शकतो.

असाच एक रामबाण घरगुती उपाय म्हणजे खोबरेल तेल. खोबरेल तेल आपल्या त्वचेसाठी खुप फायदेशीर आहे. खास करून हिवाळ्यात कारण हिवाळ्यात आपल्याला त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. जाणून घेऊया खोबरेल तेलाचे फायदे.

नारळापासून खोबरेल तेल बनवले जाते. या तेलाचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. सोबतच खोबरेल तेल एक उत्तम प्रकारचे सौंदर्यवर्धक आहे. आपण जर रोजच्या जीवनात खोबरेल तेलाचा वापर केला. तर ते खुप फायदेशीर आहे.

प्रत्येकालाच सुंदर दिसायला आवडते. आपण रोज रात्री झोपताना खोबरेल तेलाने चेहऱ्याची मालिश केली. तर आपला चेहरा खुप मुलायम आणि तजेलदार होतो. आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे डाग दिसत नाही.

अनेकांना डोळ्याखाली काळी वर्तुळ असतात. ह्या काळ्या वर्तुळांपासून सुटकारा पाण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. तुम्हाला पण हे काळे वर्तुळ काढायचे असतील. तर मग खोबरेल तेल लावा. खोबरेल तेलाने हे डाग जातात आणि डोळ्याखाली सुरकुत्या येत नाहीत.

आपण रोज अनेक ठिकाणी जातो. बाहेर गेल्यानंतर धुळ आपल्या त्वचेवर बसते आणि त्वचा खराब होते. म्हणून बाहेर जाऊन आल्यानंतर खोबरेल तेलाने हात, पाय यांची मालिश करा. यामूळे तुमची त्वचा स्वच्छ होईल आणि सोबतच मऊ देखील होईल.

अनेकांची ओठ खुप खराब होतात. काहीही केलं तरी ही ओठांची समस्या कमी नाही. यावर खोबरेल तेल एक उत्तम उपाय आहे. तुम्ही रोज तुमच्या ओठांना खोबरेल तेल लावा. त्यामूळे तुमची ओठ आकर्षित आणि सुंदर होतील.

आपल्याला केसांच्या अनेक समस्या असतात. बाहेर गेल्यानंतर धुळीने केस खुप खराब होतात. म्हणून तुम्ही खोबरेल तेलाने केसांची मालिश करा. तुमचे केस सुंदर होतील. त्यासोबतच कोंडा ( Dandruff ) देखील कमी कमी होईल.

तुम्हाला शरीरावर जखम झाली. तर खोबरेल तेल खुप फायदेशीर आहे. तुमच्या जखमेवत तेल लावा. तुम्हाला लगेच आराम मिळेल आणि त्रास कमी होईल. खोबरेल तेलात लॉरीक ऍसिड असते. त्यामूळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

महत्त्वाच्या बातम्या –

वाळलेल्या लसणाचे फायदे वाचाल तर फेकून देताना दहा वेळा विचार कराल

डोक दुखत असेल तर हे भन्नाट घरगुती उपाय करा; डोकेदुखी कुठल्या कुठे पळून जाईल

अमृतापेक्षा कमी नाही देशी गाईचे दूध; मेंदू व पोटाच्या विकारांवर तर रामबाण; जाणून घ्या फायदे

गुळ, फुटाणे खाण्याचे फायदे ऐकाल तर थक्क व्हाल; पुरूषांसाठी तर लई भारी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.