ओवा हा मसाल्यामधील महत्वाचा पदार्थ आहे. ओव्याचे अनेक गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात. ओवा चवीला तिखट,कडवट,आणि किंचित तुरवट लागतो. ओव्याचा वापर स्वयंपाकामधे सर्वसाधारण एखाद्या पदार्थाची चव वाढवण्यासाठी केला जातो.
ओव्यांमध्ये लोह ,कॅल्शिअम ,पोट्याशियम,आयोडीन,केरोटीन असते. अचानक पोटदुखीचा त्रास जाणवायला लागला तर त्यास थोडा ओवा गरम करून देणं उपयोगी ठरते.
केवळ पोटदुखीचा नाही तर सर्दी-पडसे, थंडी जाणवणे, तोंडाचा वास येणे, घसा दुखणे यासाठी ओव्याचा वापर केला जातो. ओव्यामध्ये शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकण्यास मदत करणारी तसेच पोटातील जळजळ रोखणारी तत्वे असतात.
आयुर्वेदामध्ये ओव्याचा महत्वाचा उपयोग ठरला आहे. ओव्यामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म असल्याने तो घरात ठेवणे फार महत्वाचे आहे.अपचन,गॅस झाल्यास ओव्यात काळे मीठ आणि हिंग घालून पिणे उपयुक्त ठरते.
ओव्याचे फायदे –
-ज्या लोकांना दम्याचा आजार आहे त्यांनी दिवसातून कमीत कमी एक चमचे ओवा खायला हवा. ओव्यामध्ये शरीरातील पेशींचा दाह कमी करणारे अँटी-इंफ्लेमेशन गुणधर्म आहे. त्यामुळे श्वसनाचा त्रास कमी होतो.
-जर मायग्रेनचा त्रास होत असेल तर ओव्याची पावडर पातळ कपड्यात गुंढाळून वास घेत राहिल्याने त्रास कमी होतो.
-भूक कमी करण्यासाठी ओव्याचा उपयोग केला जातो त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा आणि एक चमचा मध घातल्याने भूक नियंत्रणात राहते.
-ओवा खाल्याने पोटात जंत होण्याची प्रवृत्ती कमी होते.
-सतत गुढघे दुखत असतील तर ओवा गरम करावा आणि रुमालात बांधून गुढग्याला शेक द्यावा.
-भाजलेल्या ओव्याची पूड हिरड्याला लावल्याने हिरड्यांची सूज कमी होते.
-मुरूम दूर करण्यासाठी ओवा १०/१५ मिनिट पाण्यात भिजवा ,नंतर त्याची पेस्ट मुरूम आलेल्या जागी लावा.त्यामुळे त्वचेत अडकलेली घाण निघते आणि मुरमापासून सुटका मिळते.