रात्री झोपण्यापूर्वी ‘दुधामध्ये’ लसणाच्या पाकळ्या टाकून खाल्यास होतील ‘हे’ जबरदस्त फायदे

फार पूर्वीपासूनच लसणाचा आयुर्वेदामध्ये उपयोग सांगितला गेला आहे. लसूण खाल्याने शरीरातील रक्तभिसरण प्रक्रीयेला गती मिळते. तसेच आपण वर्षानूवर्ष पाहत आलो की, पोट दुखू लागले की लसूण आणि ओवा खायला देतात. तसेच लसूण खाल्यास शरीरातील शुगर नियंत्रणात राहते.

रोजच्या जेवणामध्ये लसूण आवर्जून वापरला जातो, असेच म्हणा की, लसणाशिवाय जेवण बनवणे पूर्णच होत नाही. डॉक्टरही आपल्याला नियमित लसूण खाण्यास सांगतात. परंतु काही लोकांच्या घरी लसूण खाणे वर्ज असते, जसे की गुजराती जैन लोक लसणाचा वापराच करत नाही. परंतु अश्या लोकांनीही लसूण खाणे गरजेचे आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुरुषांनी रात्री लसूण खाल्ला पाहिजे. लसणामध्ये एलिसिन नावाचा घटक असतो ज्यामुळे पुरुषांमधील हार्मोन्स नियंत्रित राहतात. तसेच लसणाचे अनेक चमत्कारिक असे फायदे आपल्याला पाहायला मिळतात. आज आपण दूध आणि लसूण एकत्रपिण्याचे फायदे पाहणार आहोत.

कोलेस्ट्रॉल-  अनेकांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढीची समस्या असते. जर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर रक्तवाहिन्या ब्लोकेज निर्माण होऊ शकतात. त्यासाठी अनेक लोकांना रोज औषधे घ्यावी लागतात. हे टाळण्यासाठी दूध आणि लसूण एकत्र पिण्याने हा धोका कमी होतो.

बद्धकोष्टता-    जवळपास सगळ्याच लोकांची पोट साफ न होण्याची तक्रार असते. वेगवेगळे उपाय करूनही ही समस्या पिच्छा सोडत नाही आणि त्यामुळे तोंड येणे, उष्णता वाढणे असे आजार उद्भवतात. अश्या लोकांनी दुधा सोबत लसणाची पेस्ट करून रात्री झोपण्यापूर्वी घ्यावी.

अपचन –  सामान्यता अपचनाचा त्रास छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असतो.  जास्त मसालेदार, तेलकट, किवा बाहेरचे अन्न खाल्याने अपचनाचा त्रास जाणवतो. तसेच कोरोनामुळे बऱ्याच लोकांना घरून काम करण्याची मुभा आहे,त्यामुळे त्यांचे चालणे होत नाही. शरीराची हालचाल न झाल्यामुळे अपचनाच त्रास होतो. अश्या वेळी लसून आणि दूध एकत्र पिल्याने हा त्रास कमी होतो.

गुडघेदुखी –   वाढत्या वयानुसार लोकांना गुडघेदुखीचा त्रास जाणवायला सुरवात होते. तसेच जास्त वजन वाढल्यावरही गुढगेदुखी होते. अश्या लोकांनी लसूण आणि दुधाची पेस्ट एकत्र करून घेतल्याने गुघेदुखी कमी होते.

मायग्रेन-  याला मराठीत अर्धशिशी असेही म्हणतात. हा त्रास अनेक लोकांमध्ये दिसून येतो. यावर उपाय म्हणून अशी लोक गोळ्या सोबतच ठेवतात, परंतु जास्त गोळ्यांच्या सेवनाने शरीराला हानी होऊ शकते. अश्या लोकांनी देखील लसूण आणि दूध एकत्र करून प्यावे.

लसूण पेस्ट बनवण्याची पद्धत-  एक कप दुधात थोडे पाणी घालावे. ते चांगले उकळून द्यावे. नंतर दूध थंड झाल्यावर त्यात लसूण टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. हे मिश्रण चांगले मिसळून घ्यावे. या मिश्रणाचे सेवन सकाळच्या वेळी करणे योग्य ठरेल.

हे ही वाचा-

२५ लोकांची खिंड एकट्या नवरदेवाने लढवली, पुर्ण मंडपात एकटाच वेड्यासारखा नाचला, पहा व्हिडीओ

ना हात ना पाय, तरी असं आयुष्य जगतोय हा माणूस की जगातली माणसं घालतील तोंडात बोट

जास्तीची हाव न ठेवता चंद्र आहे साक्षीला मालिका झाली बंद; जाणून घ्या त्यामागचे कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.