कोरोना काळात डबल मास्क वापरणे किती फायदेशीर? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला..

नवी दिल्ली । सध्या कोरोनाला हरवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र दिवसेंदिवस अनेकांचे मृत्यू होत आहेत. सरकारने लॉकडाऊन जाहीर करून नियम लागू केले आहेत. काहीजण मास्कचा वापर करत आहेत, तर काहीजण काळजी न घेता मास्क वापरत नाहीत.

अशातच डबल मास्क वापरण्याबाबाबत काही पोस्ट व्हायरल होत आहेत. याबाबत डबल मास्कबाबत सत्य काय आहे, याबाबत आता तज्ञांनी माहिती दिली आहे. कोणता मास्क कधी आणि अगोदर कोणता मास्क लावला, याबाबत माहिती देण्यात आली आहे.

एक कापडी मास्क आणि एक सर्जिकल मास्क असल्यास प्रथम सर्जिकल मास्क लावावा आणि त्यावर कापडी मास्क लावावा. तसेच N-95 मास्कचा वापर करत असाल तर तुम्हाला डबल मास्कची गरज लागणार नाही. हा मास्क पूर्णपणे सुरक्षित आहे.

तोंड आणि नाक नीट झाकले जाईल. अशा पद्धतीने मास्क लावावा, एकाचवेळी दोन सर्जिकल मास्क लावण्याचा सल्ला सहसा दिला जात नाही. अनेकजण मास्क व्यवस्थित वापरत नसल्याने त्यांना कोरोना झाल्याचे दिसून आले आहे.

तसेच आपण कापडी मास्क वापरत असाल तर तो मास्क रोज गरम पाण्यात धुवा. सर्जिकल मास्क एकाचवेळी वापरून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. यामुळे कोरोनाचा धोका कमी होईल.

अमेरिकेत काही दिवसांपूर्वी डबल मास्कबाबत परीक्षण करण्यात आले. यामध्ये डबल मास्क वापरल्याने कोरोना व्हायरसचा फैलाव ९५ टक्के रोखला जाऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी डबल मास्क घातला तर स्थितीत मोठ्या प्रमाणावर सुधार होईल. असा सल्ला तज्ञ देत आहेत. यामुळे डबल मास्क वापरला तर धोका अजून कमी होणार आहे.

ताज्या बातम्या

कोरोना काळात राजकारण करू नका, नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीसांना झापले

ज्या नेत्याने राहुल गांधीच्या कुत्र्यामुळे सोडली होती काँग्रेस, त्याच नेत्याला भाजपने बनवले मुख्यमंत्री

तुम्हीही करू शकता निळ्या रंगाच्या केळीची शेती, वाचा निळ्या रंगाच्या केळीचे आश्चर्यकारक फायदे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.