“पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचे आहे ते सगळं करणार”

मुंबई । राज्यावर सध्या कोरोनाचे संकट असतानाच चक्रीवादळाचे देखील संकट आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या फळबागा, घरे देखील यामध्ये जमीनदोस्त झाल्या आहेत. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा कोकण किनारपट्टीला बसला.

तसेच पश्चिम महाराष्ट्र, गोवा, गुजरात या ठिकाणी देखील जोरदार पाऊस पडला. मुंबईमध्ये समुद्राच्या लाटा जोरदार उसळत होत्या. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काल हवाईमार्गाने गुजरातमध्ये नुकसानाची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता निशाना साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय, असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.

मी येथे फोटोसेशन करायला आलेलो नाही, नुकसानीची पाहणी करायला आलोय. नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण होतील. त्यानंतर नुकसानीचा अंदाज येईल. कोणत्या निकषानुसार मदत जाहीर करायची हे नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर ठरवणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यामुळे सध्या तरी नुकसान भरपाई मिळणार नसून पंचनामे पूर्ण झाल्यावर मदत मिळण्याची शक्यता आहे. पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचे आहे ते सगळं करणार आहे. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात दौरा केला. त्यांनी हवाइमार्गे पाहणी केली. तसेच राज्याला एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात येत असल्याचे मोदींनी जाहीर केले.

ताज्या बातम्या

दिग्दर्शकाने बोल्ड सीन्स कट केल्यामूळे दिग्दर्शकावर भडकली होती अभिनेत्री; नाव वाचून धक्का बसेल

वयाची पन्नासी पार करुन देखील २० वर्षांच्या दिसतात ‘या’ अभिनेत्री; जाणून घ्या त्यांच्या फिटनेसचे सीक्रेट

कोरोनामुळे होऊ शकतो मधुमेह? आयसीएमआरच्या डॉक्टरांनी दिली ‘ही’ माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.