शेतकऱ्याने बांध कोरत कोरत चक्क देशाची सीमाच बदलली; वाचा कुठे घडलाय हा प्रकार

बेल्जियमच्या शेतकऱ्याने चुकुन फ्रान्सच्या सीमेशी आपल्या देशातील सीमेतून फेरबदल केला आहे. त्यामुळे सगळीकडे हा चर्चेचा विषय ठरला आहे. शेतकऱ्याने बांध सरकवत सरकवत चक्क देशाची सीमा बदलून टाकल्याचा प्रकार घडला आहे.

शेतकऱ्याच्या या कामामुळे फ्रान्सची सीमा छोटी झाली आहे. असे असले तरी त्या शेतकऱ्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसून या शेतकऱ्याकडून पुन्हा तो दगड त्या जागेवर ठेवण्यात येणार आहे.

दोन्ही देशांच्या सीमा दर्शवणारा दगड या शेतकऱ्याने ७.५ फुट सरकवला गेलेला होता. त्या परीसरातील एक शेतकरी या दगडामुळे खुप नाराज होता, कारण हा दगड नेहमीच त्याच्या ट्रॅक्टरच्या रस्त्यात यायचा. त्यामुळे त्याने चुकून तो दगड फ्रान्सच्या सीमेपलिकडे ढकलून दिला.

तो दगड फ्रान्सच्या सीमेपलिकडे सरकवल्याने बेल्जियम मोठे तर फ्रान्स आता छोटे झाले आहे. तसेच जमीनीच्या जागेवर तर शेजाऱ्यांमध्ये भांडणं होतात, हा तर दोन देशांचा विषय होता. हा दगड त्या ठिकाणी १८२० मध्ये ठेवण्यात आला होता.

या सर्वप्रकारावर बेल्जियमचे मेयर यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही. तसेच मी तर आनंदी की आमचा देश मोठा झाला आहे, पण शेजारच्या प्रांताला अडचण असू शकते, असे हसत हसत त्यांनी म्हटले आहे. तर फ्रान्सीसी गावचे मेयर यांनीही हा प्रश्न इतका गंभीर नाहीये, असे म्हणत त्यावर बोलणे टाळले आहे.

दरम्यान, बेल्जियमच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, आम्ही त्या शेतकऱ्याला तो दगड पुन्हा त्या ठिकाणी ठेवण्यास सांगू. जर त्याने ऐकले नाही, तर आम्ही त्याच्यावर कारवाई करु. तसेच शेतकऱ्याने ऐकले नाही, तर हा मुद्दा बेल्जियमच्या विदेश मंत्रालयातही जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या बॉडीला स्पर्श केल्याने आपल्याला कोरोना होतो का? डॉक्टर म्हणतात…
माझं पुर्ण कुटुंब कोरोना पाॅझीटीव्ह, प्लिज आमच्यासाठी प्रार्थना करा; शिल्पा शेट्टीची आर्त हाक
“संसदेसाठी, पुतळ्यांसाठी २० हजार कोटी, मग लसीकरणाला ३० हजार कोटी का नाहीत?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.