जाणून घ्या ‘ऊपर आका नीचे काका’ म्हणीचे रहस्य; काकांच्या नावाने भिक मागायचे भिकारी

राजेश खन्ना त्यांच्या काळातील सर्वात मोठे स्टार होते. त्यांच्यासारखे स्टारडम आजही कोणत्याही अभिनेत्याला मिळाले नाही. त्यामूळे त्यांचे यश खुप खास होते. त्यांचे खरे नाव जतिन खन्ना होते. पण फिल्म इंडस्ट्रीने त्यांचे नाव राजेश खन्ना ठेवले होते.

८० च्या दशकात राजेश खन्ना हे नाव घराघरात जावून पोहोचले होते. लोकं त्यांच्या नावावरुन आपल्या मुलांची नावे ठेवत होती. त्यांचे स्टारडम पाहता त्यांना बॉलीवूडचे पहीले सुपरस्टार बोलले जाते. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट केले आहेत.

त्यांनी एका पाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ज्यामूळे त्यांनी त्यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. आजही त्यांनी बनवलेले रेकॉर्ड कोणीही मोडू शकले नाही. १०० पेक्षा अधिक हिट चित्रपटांमध्ये राजेश खन्नाने काम केले आहे.

एका पाठोपाठ एक पंधरा हिट चित्रपट देऊन राजेश खन्ना खुपच जास्त प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांची खुप क्रेझ होती. असे बोलले जाते की, राजेश खन्ना त्यांच्या पांढऱ्या मर्सिडीजमध्ये घरी बाहेर पडायचे त्यावेळी लोकं पागल व्हायचे.

तरुणी तर त्यांच्या पांढऱ्या गाडीला लिपस्टिकने लाल करायच्या. एवढेच नाही तर त्याकाळी भिकारी देखील राजेश खन्नाच्या नावाने भिक मागू लागले होते. ही गोष्ट काकांना समजल्यानंतर त्यांना थोडा धक्का बसला होता.

एकदा राजेश खन्ना मुंबईच्या विलेपार्लेमध्ये त्यांच्या चित्रपटाची शुटींग करत होते. त्या कॉलेजच्या बाहेर एक भिकारी बसला होता. जो काकांच्या नावाने भिक मागायचा. त्यानंतर शहरातील भिकाऱ्यांनी काकांच्या नावाने भिक मागायला सुरुवात केली.

तेव्हापासूनच सगळीकडे ‘ऊपर आका और नीचे काका’ ही म्हण प्रसिद्ध झाली होती. आजही लोकं या म्हणीचा वापर करत असतात. त्यावेळी हा डायलॉग खुपच प्रसिद्ध झाला होता. याचा वापर करत अनेक भिकारी मुंबईच्या रस्त्यावर भिक मागत फिरायचे.

राजेश खन्नाला त्यांचे मित्र आणि चाहते प्रेमाने काका म्हणायचे. त्यांचे स्टारडम ७० च्या दशकात खुपच होते. इंडस्ट्रीतील प्रत्येक दिग्दर्शक त्यांच्यासोबत काम करायला तयार असायचा. आजही त्यांच्यासारखे स्टारडम कोणत्याही अभिनेत्याला भेटले नाही.

महत्वाच्या बातम्या –
अमिताभसोबत सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम करणारे गोगा कपूर बॉलीवूडमधून गायब का झाले? वेगळीच माहिती आली समोर
अग्गबाई सासूबाई…! प्रार्थना बेहरे पेक्षाही सुंदर आहेत तिच्या सासूबाई, पहा फोटो
प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा नवरा आहे साउथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता; पहा फोटो..
मल्लिका दिसली स्विमिंगपुलमध्ये बिकीनीवर अंघोळ करताना; व्हिडिओ पाहून चाहते पण झाले घायाळ, पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.