भिकारी समजून शोरूममधून हाकलले त्याच व्यक्तीने विकत घेतली १२ लाखांची बाईक

थायलंडमध्ये एका व्यक्तीसोबत एक किस्सा घडला. तो एका शोरूमच्या बाहेर उभा राहून महागड्या गाड्या बघत होता. त्याने शोरूमच्या आत जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला भिकारी समजून धक्का देऊन बाहेर काढण्यात आले.

तो व्यक्ती दिसायला जरी भिकाऱ्यासारखा दिसत असला तरी तो भिकारी नव्हता. कारण त्याच व्यक्तिने शोरूममध्ये जाऊन १२ लाखांची गाडी खरेदी केली. सध्या थायलंड मधील लुंग डेचा नावाच्या व्यक्तीचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

कपड्यांवरून तो मजदूर किंवा भिकाऱ्यासारखा दिसत होता पण त्याने १२ लाखांची गाडी खरेदी करून सगळ्यांना धक्का दिला. कारण कोणीही त्यांना बघून भिकारी म्हणाले असते. शोरूममधल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना भिकारी समजले होते.

कारण ते १० ते १५ मिनिटे शोरूमच्या बाहेर उभे राहून आपल्याला ती गाडी खरेदी करायची आहे असे म्हणत होते. पण सेल्समनला वाटले हा भिकारी येथून जाणार नाही म्हणून त्याने जबरदस्तीने त्यांना बाहेर काढले. पण लुंग आपल्या मतावर ठाम होते त्यांनी शोरूमच्या मॅनेजरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

लुंग यांच्या हातात एक बॅग होती. कर्मचारी त्यांच्यावर हसत होते पण त्यांनी ओरडून आपल्याला मॅनेजरला भेटायचे आहे असे सांगितले. हा संपूर्ण गोंधळ एकून मालक बाहेर आले आणि त्यांनी सर्व घटना एकूण घेतल्यानंतर लुंग यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला.

शोरूम मालकाने त्यांना harley davidson बाईक दाखवली आणि हिची किंमत १२ लाख रुपये आहे असे सांगितले. लुंग यांनी आपल्या बॅगेतून १२ लाख रुपये काढले आणि मालकाला दिले.

यानंतर सगळे आश्चर्यचकित झाले व सगळ्यांना आपली चूक लक्षात आली. कारण कोणाच्याही कापड्यांवरन त्याच्या राहणीमान आणि परिस्तिथीचा अंदाज लागत नाही हेच खरे आहे.

महत्वाच्या बातम्या-

उद्यापासून भारतात होणार पाच मोठे बदल; जाणुन घ्या

एकनाथ खडसे इन ॲक्शन! मोठा गैरव्यवहार उघड करणार; तेही पुराव्यासहीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.