कारगिल युद्धाला जाण्याच्या आधी शहिद विक्रम बत्रा यांनी प्रियसीचा भरला होता रक्ताने भांग; वाचा संपूर्ण प्रेमकहाणी

मुंबई। अशा अनेक प्रेम कहाणी असतात ज्या मनाला भावणाऱ्या असतात. काही जणांचं प्रेम यशस्वी होत तर काहींची साथ अर्ध्या रस्त्यातचं सुटते. मात्र ही साथ सुटण्याची अनेक करणं असतात. आपण आतापर्यंत पाहिलं आहेच. की प्रेम केलं की ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बोटावर मोजण्या इतकीच मंडळी निभावत असतात.

मात्र काही काही प्रेम कहाण्या या मन हिलावून आणि थेट मनात जागा बनवणाऱ्या असतात. अशीच एक प्रेम कहाणी म्हणजे कारगिल युद्धात शहिद झालेले जवान कॅप्टन विक्रम बत्रा आणि त्यांच्या प्रियसीची. खरतर कारगिल युद्ध जिंकून २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र त्या क्षणाच्या आणि युद्धाच्या आठवणी अजूनही तशाच ताज्या आहेत. कारगिल युद्धात शहिद झालेल्या प्रत्येक जवानाच्या स्मरणार्थ देशवासी कायमच मानवंदना देत असतात.

देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या अशाच चेहऱ्यांपैकी एक नाव म्हणजे, शहीद कॅप्टन विक्रम बत्रा. देशासाठी प्राण त्यागणाऱ्या विक्रम बत्रा यांची प्रेमकहाणीही सर्वांच्या काळजाचा ठाव घेणारी. डिंपल छीमा असं विक्रम बत्रा यांच्या प्रेयसीचं नाव. १९९५ मध्ये पंजाब विद्यापीठात त्यांची पहिल्यांदाच भेट झाली होती. आधी मैत्री आणि नंतर प्रेम असा त्यांचा प्रवास सुरु होता.

पाहता पाहता त्या दोघांनीही आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ देण्याचं वचनं दिली. डिंपल छीमा यांची साधारण दोन वर्षांपूर्वी मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या की, एमए इंग्रजीच्या अभ्यासक्रमासाठी दोघांनीही प्रवेश घेतला होता. अर्थात या दोघांचंही शिक्षण पूर्ण झालं नाही. आमची भेट घडवून आणण्यासाठीचा तो सर्व नियतीचाच खेळ होता, असं डिंपल म्हणाल्या होत्या. बत्रा यांना विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर देहरादून येथे असणाऱ्या सैन्यदल प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळाला होता.

त्या दरम्यान आमची प्रेम कहाणी देखील सुरु होती. हे दोघं एकमेकांपासून दूर असूनही त्यांच्या मनात मात्र तेच होते. जसे दिवस जात होते तशी दोघांच्याही कुटुंबियांकडून लग्नाची विचारणा होऊ लागली होती. मुळात आपण एकमेकांसाठीच या जगात आलो आहोत, हे विक्रम आणि डिंपल जाणून होते.

एके दिवशी मनसा देवी आणि श्री नाडा साहेब गुरुद्वारा येथे भेट दिली असता परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर विक्रम बत्रा हे अचानक डिंपल यांना म्हणाले, ‘अभिनंदन मिसेस बत्रा, आपण दोघांनी सोबतीने चार फेरे मारले, तुमच्या लक्षात आलं नाही’. त्याचवेळी डिंपल यांच्या लक्षात आलं की पूर्णवेळ विक्रम त्यांच्या ओढणीचं टोक पकडून होते. कुटुंबियांकडून वारंवार होणाऱ्या लग्नाच्या विचारणेमुळे एक दिवस डिंपल यांनी विक्रम बत्रांना लग्नाबद्दल विचारलं होतं.

त्यानंतर विक्रम बत्रा यांनी आपल्या पाकिटातून ब्लेड काढलं आणि अंगठा कापला. यानंतर आपल्या अंगठ्याने त्यांनी डिंपल यांची भांग रक्ताने भरली. हा जीवनातील सर्वात अनमोल क्षण होता, असं डिंपल यांनी सांगितलं. या साऱ्यामध्येच कारगिल युद्धाची घोषणा झाली आणि बत्रा यांना बोलवण्यात आलं. कुटुंबियांनी चर्चा केल्यानंतर आणि या दोघांचेही विचार अंदाजात घेत कारगिल युद्धानंतर त्यांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला.

नियतीच्या मनात मात्र काही वेगळं होतं. कारगिल युद्धावर असतेवेळी कॅप्टन विक्रम बत्रा यांना वीरमरण आलं. तिथे घराकडे त्यांच्या लग्नाची तयारी सुरु होती. तर, इथे कॅप्टन जगाचा निरोप घेऊन गेले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी ‘ती’सुद्धा उपस्थित होती. त्याचवेळी ऐन तारुण्यात जोडीदाराला कायमचं गमावणाऱ्या विक्रम बत्रा यांच्या होऊ पाहणाऱ्या सहचारिणीनं त्यांच्या निधनानंतर कोणासोबतही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता.

वयाच्या 22 व्या वर्षी घेतलेला हा निर्णय घेतला. खुद्द विक्रम बत्रा यांच्या वडिलांनीही ही एक आदर्श प्रेमकहाणी असल्याचं म्हणत आपल्या मुलाच्या प्रेमाखातर जीवनात मोठा त्याग करणाऱ्या त्या मुलीचं कौतुक केलं आहे. डिंपल विक्रम बत्रा यांची वाट पाहत राहिल्या. ते शहीद झाल्यानंतरही त्यांच्या प्रतीक्षेत त्या आहेत. डिंपल यांनी कॅप्टन बत्रायांच्या नावावर स्वत: च आयुष्य केलं आणि पुन्हा एकदा प्रेम कायमच अमर असतं हे सिद्ध करुन दाखवलं.

त्यांच्या आयुष्यावर आधारीत ‘शेरशाह’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विक्रम बत्रा यांची प्रेमकहाणी देखील दाखवण्यात आली आहे. ‘शेरशाहर’ या चित्रपटात विक्रम बत्राची भूमिका अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने साकारली आहे. तर अभिनेत्री कियारा आडवाणीने विक्रम बत्राच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे.
महत्वाच्या बातम्या
कडक! महेंद्रसिंगच्या नव्या लूकनं सोशल मीडियावर लावली आग; फोटो तुफान व्हायरल
जया प्रदाला एकदा चालू ट्रेनमध्येच करावी लागली होती अंघोळ, कारण…; जया प्रदाने सांगितला ‘तो’ किस्सा
काय सांगता! ‘या’ शेतकऱ्याने लावले शेतात सनी लिओनीचे पोस्टर, कारण ऐकून वाटेल नवल
चार्जिंगच नो टेन्शन! फक्त १० मिनिटांत फुल चार्ज होणार इलेक्ट्रिक कार, चार्ज केल्यावर चालणार १००० किमी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.