दसरा मेळाव्याआधी शिवसेना-भाजप युती ? केंद्रीय मंत्र्याने सांगितला तडजोडीचा फाॅर्म्युला

शिवसेनेला अधिक वेळ सत्ता लाभ हवा असल्यास भाजप सोबत त्यांचे भवितव्य उज्वल असून त्यांच्या सोबत युती करणे योग्यतेचे ठरेल असे मत सामाजिक न्याय मंत्री आणि खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

अडीच वर्षांच्या फॉर्मुल्यावर दोन्ही पक्षांनी एकमत दाखवत सत्तेत एकत्र येण्यास काहीच हरकत नाही अस रामदास आठवले यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. दसरा मेळाव्याआधी त्यांनी भाजप सोबत यावं अस मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

“तिन्ही पक्षांत धुसमूस सुरु असून सातत्याने एकमेकांवर आरोप केले जात आहेत. रोज एकमेकांवर गंभीर आरोप करणं आणि परत सत्तेत राहणं परवडणारं नाही. काँग्रेसने पाठिंबा काढावा किंवा शिवसेनेने मुख्य प्रवाहात म्हणजेच भाजपासोबत यावं.

अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री राहावं आणि अडीच वर्ष फडणवीस यांना मुख्यंमंत्री करावं. पुढच्या निवडणुका एकत्रित लढून महाराष्ट्राचं भलं करावं,” असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले,“आनंद गीते यांचं वक्तव्य योग्य नाही. शरद पवार सन्माननीय नेते आहेत. कोणत्या पक्षाचे नेते नाहीत हे खरं आहे, मात्र ते महाराष्ट्राचे नेते आहेत. शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला असं नाही, तर त्यांना काँग्रेसमधून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असं नाही,”

“शरद पवारांवर इतका गंभीर आरोप केला आहे तर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये. शिवसेनेने पुन्हा एकदा स्वगृही परतत भाजपा, आरपीआयसोबत मिळून बाळासाहेबांचं शिवशक्ती भिमशक्ती स्वप्न साकार केलं पाहिजे,” असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.

 

महत्वाच्या बातम्या
काय सांगता! चिकनपेक्षा मेथी महाग, भाज्यांचे दर शंभरीपार, शेतकरी सुखावला
मुंबई पोलीसांनो माझी माफी मागा, नाहीतर..; किरीट सोमय्यांची मागणी
“५६ आमदार असलेले मुख्यमंत्री होतात, मग ११९ वाले राज्यसभेत का जाणार नाहीत?”
काय सांगता! चिकनपेक्षा मेथी महाग, भाज्यांचे दर शंभरीपार, शेतकरी सुखावला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.