हृदयस्पर्शी! मायलेकीचा विहीरीत बुडून मृत्यू; मृत्युनंतरही चिमुकलीने आईला मारलेली मिठी तशीच होती

विहिरीत पडलेल्या आपल्या दीड वर्षाच्या मुलीला वाचवायला विहिरीत उडी घेतलेल्या आईचा तिच्या चिमुकलीसह मृत्यू झाला आहे. ही घटना केज तालुक्यातील बानेगाव येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आईचे नाव आशा जाधवर (२२) वर्ष आणि मुलगी शांभवी जाधवर (दीड वर्ष) अशी या माय लेकीची नाव आहेत. आशा यांच्या पतीचे काही महिन्यांपूर्वीच कोरोनाने निधन झाले होते. दोघेही पती पत्नी पुण्यात शिक्षक होते.

या दोघांचाही विवाह ३ वर्षाआधी झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर आशा यांना मानसिक धक्का बसल्यामुळे आशा जाधव ह्या त्यांच्या माहेरी बानेगावला आल्या होत्या. आशा जाधवर यांचे वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते आणि आई शेतात काम करण्यात व्यस्त होती.

सायंकाळी आशा मुलीला घेऊन शेतात गेल्या. मुलगी शांभवी खेळता खेळता शेताजवळील विहिरीकडे गेली. तिचा तोल जातो हे बगताच आशा तिला वाचवायला पुढे गेल्या आणि यावेळीच आशा यांचा तोल जाऊन दोघीही विहिरीत पडल्या.

सायंकाळी दोघीही घरी आल्या नाहीत म्हणून शोधाशोध सुरू झाली यावेळी विहिरीच्या कडेला आशा यांची चप्पल सापडली तेव्हा गावकऱ्यांनी विहिरीतून पाणी उपसलं तोपर्यंत दोघी मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

जेव्हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला तेव्हा मुलीने आईच्या कुशीत घट्ट मिठी मारली होती तर आईनेही मुलीचा हात पकडुन ठेवला होता. हे दृश्य पाहून सर्वांचं हृदय भरून आलं. दोघी मायलेकींच्या मृत्युने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

महत्वाच्या बातम्या
चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपमध्ये येण्याची आॅफर; मुश्रीफांचा सणसणाटी गौप्यस्फोट 
मोठी बातमी! घोटाळ्यात किरीट सोमय्या यांनी घेतले थेट शरद पवारांचे नाव, राज्यात खळबळ…
ट्वेंटी पाठोपाठ विराट कोहली ‘या’ फॉर्मॅटमधील कर्णधारपदही सोडणार; स्वत:च केली घोषणा
कन्यादान का म्हणता, दान करायला मुली वस्तू आहेत का?आलिया भटचा संतापजनक सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.