बीडमधील(Beed) एका शेतकऱ्याने आयुष्यभर काबाडकष्ट करून जमा केलेली रक्कम घरामध्ये लागलेल्या आगीत जळून खाक झाली आहे. मोहम्मद शेख(Mohmmad Shaikh) या शेतकऱ्याने घरामध्ये दोन लाख रुपये ठेवले होते. पण घराला लागलेल्या आगीत ते दोन लाख रुपये अक्षरशः जळून खाक झाले आहेत. या नोटांची राख झालेली बघून शेतकऱ्याच्या काळजाचं पाणी झालं आहे.(beed farmer house burned into flames)
मोहम्मद शेख या शेतकऱ्याच्या घरी मध्यरात्री गॅस(Gas) सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये मोहम्मदच्या घराचे मोठे नुकसान झाले. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या दारात बांधलेल्या शेळ्या मरण पावल्या आहेत. या स्फोटामध्ये मोहम्मद शेखने आयुष्यभर जमा केलेली रक्कम डोळ्यादेखत जळून गेली आहे. या आगीत एक महिला आणि छोटी मुलगी देखील जखमी झाली आहेत.
ही दुर्देवी घटना आष्टी तालुक्यातील वहिरा या गावात घडली आहे. या गावातील मोहम्मद शेख या शेतकऱ्याच्या राहत्या घरात गॅसचा स्फोट झाला आहे. या आगीत पाच शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. या आगीमध्ये या शेतकऱ्याच्या घरातील संसारोपयोगी वस्तू जाळून खाक झाल्या आहेत. या आगीत मोहम्मद शेख यांनी आयुष्यभर कष्ट करून जमवलेले दोन लाख रुपये देखील जाळून खाक झाले आहेत.
मोहम्मद शेख वहिरा गावात त्यांच्या कुटुंबासोबत राहत होते. मोहम्मद शेख यांनी रात्री जेवण केले. त्यानंतर ते झोपी गेले. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरात मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की, घरातील गॅसची टाकी सुमारे एक ते दीड किलोमीटर लांब जाऊन पडली. या स्फोटामुळे घराला भीषण आग लागली.
या आगीतून कुटुंबातील लोक कसेबसे जीव वाचवत घराबाहेर पडले. गावकऱ्यांनी अथक प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. पण तोपर्यंत मोहम्मद शेख यांचे घर जाळून खाक झाले होते. हा स्फोट नेमका कसा झाला, यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. या दुर्घटनेत मोहम्मद शेख यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या वृद्ध महिलेला आणि मुलीस जवळच्या रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. मोहम्मद शेख यांची आयुष्यभराची जमापुंजी या आगीत जाळून गेली आहे. या घटनेबद्दल वहिरा गावातील लोकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली याचा सध्या पोलीस तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
भाजप खासदारावर कार्यकर्त्यानेच केले कोट्यावधींच्या फसवणूकीचे आरोप; वाचा पुर्ण प्रकरण…
सॅल्युट! सॉफ्टवेअरची नोकरी सोडून आदिवासी शेतकऱ्यांना केली मदत, तीन पटीने वाढवले त्यांचे उत्पन्न
ईशान किशनची गर्लफ्रेंड दिसते लाखात एक, बॉलिवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या, पहा फोटो