Share

Beed Crime : ‘सगळी मुलं घरी गेल्यानंतर सर मला केबिनमध्ये थांबवून कपडे काढायला लावायचे, अन्…’; बीडमध्ये गुरु-शिष्य नात्याला काळिमा फासणारी घटना

Beed Crime : बीड शहरातील एका नामवंत कोचिंग संस्थेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकांकडून झालेल्या लैंगिक छळामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्र हादरून गेले आहे. या प्रकरणामुळे शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनंतर दोन शिक्षकांविरोधात पोक्सो कायदा आणि संबंधित गुन्हेगारी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, तिने एप्रिल 2024 मध्ये NEET परीक्षेसाठी या संस्थेत प्रवेश घेतला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते. पण काही महिन्यांतच एका शिक्षकाने सतत त्रास देणे सुरू केले. हे प्रकरण पुढे इतके गंभीर झाले की त्या शिक्षकाने तिला एकटीला कॅबिनमध्ये बोलवून तिच्यावर बॅड टच केला, तिचे कपडे उतरवायला लावले आणि तिचे फोटो काढले, असा गंभीर आरोप आहे.

वारंवार छळ, धमक्या आणि फोटोद्वारे ब्लॅकमेल

शिक्षक प्रशांत खाटोकर (Prashant Khatokar) तिला वारंवार धमकी दिली की, “जर ही गोष्ट घरी कुणालाही सांगितली, तर तुला मारून टाकीन.” त्यामुळे ती पूर्णपणे मानसिक दबावाखाली होती. केवळ कॅबिनच नव्हे तर रिकाम्या वर्गांमध्येही तिच्याशी अश्लील वर्तन केलं जात असल्याचं तिने स्पष्ट केलं.

या सततच्या छळाला कंटाळून पीडित मुलीने दुसऱ्या शिक्षक विजय पवार यांना ही माहिती सांगितली. पण त्यांच्याकडून मदतीऐवजी तिला “त्यांना मुद्दाम अशा कारणांसाठीच ठेवले आहे” असं सांगण्यात आलं. नंतर विजय पवार यांचे वर्तनही अश्लील आणि वाईट बनले. त्यांनीही तिला एकटी असताना स्पर्श करून त्रास देण्यास सुरुवात केली, असा तक्रारीत उल्लेख आहे.

या त्रासामुळे तिचं वागणं बदललं, चेहरा कायम भीतीने भरलेला असायचा. इतर विद्यार्थ्यांनीही तिच्याकडे संशयाने बघायला सुरुवात केली. ती वर्गात एकटी राहायची, संवाद कमी झाला होता. तिच्या एका मैत्रिणीनेही तिला “सरांविषयी आदर ठेवावा” असं सांगून तिला दुर्लक्षित केलं.

या सर्व प्रकारामुळे मानसिकदृष्ट्या थकलेल्या विद्यार्थिनीने अखेर धैर्य एकवटून संपूर्ण घटना आई-वडिलांना सांगितली. त्यांनी तिला घेऊन थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशन (Beed) गाठलं. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पोक्सो कायद्यानुसार (POCSO Act) आणि IPC च्या विविध गंभीर कलमान्वये दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणानंतर बीडसह संपूर्ण मराठवाड्यातील खाजगी क्लासेसमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सध्या पोलिसांकडून आरोपी शिक्षकांविरोधात सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात गुन्हेगारी स्वरूप निश्चित झाल्यास कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now