मधमाश्यांनी उघडले बाटलीचे झाकण, आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

सोशल मिडीयावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील अनेक व्हिडीओ असे असतात की आपल्याला विचार करायला भाग पाडतात. तर असे काही व्हिडीओ असतात की आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात.

काही व्हिडीओ असे असतात की आपल्याला विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तुम्ही तहानलेल्या कावळ्याची गोष्ट तर वाचलीच असेल. ज्यामध्ये कावळ्याला तहान लागलेली असते आणि पाणी पिण्यासाठी कावळा रांजणात दगडं टाकून आपली तहाण भागवतो.

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते असा धडा आपल्याला त्यातून मिळतो. याशिवाय अशा अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. या दोन्ही गोष्टी एकत्र करणारा एक अफलातून व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. यामध्ये दोन मधमाशा एका बाटलीचे झाकण खोलत आहेत.

तुम्हाला सुरूवातीला विश्वास बसणार नाही पण व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच विश्वास बसेल. ब्राझिलमध्ये ही घटना घडली आहे. ब्राझिलच्या साओ पावलोमध्ये दोन मधमाश्यांनी मिळून एका प्लास्टीकच्या बाटलीचं झाकण उघडलं आहे.

या व्हडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे आणि हजारो लोकांनी याला लाईक केले आहे. व्हायरललॉग एजन्सीने ही व्हिडीओ शेअर केली आहे. दोन मधमाश्यांनी अतिशय पद्धतशीरपणे बाटलीचं झाकण उघडल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हा व्हिडीओ पाहून अनेक लोक अवाक झाले आहेत. फक्त दहा सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये दोन मधमाशा झाकणावर एकमेकांच्या विरूद्ध दिशेने बसल्या आहेत. मधमाशा झाकणाला वरच्या दिशेने फिरवत आहेत. आपल्या पुढील पायाने त्या हा कारनामा करत आहेत.

माझ्या कार्यालयीन वेळेत लंच ब्रेक असताना मी हा व्हिडीओ रेकॉर्ड केला असं व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने सांगितले आहे. ट्वीटरवर या व्हिडीओला १३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. युट्यूबवरही अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या
सुशांतच्या निधनाला एक वर्ष पुर्ण होण्याच्या आधीच रियाने केली ‘ही’ पोस्ट, चाहते म्हणाले..
तुमच्या लाडक्या लक्ष्याची मुलगी स्वानंदी सौंदर्यात देते मोठ-मोठ्या अभिनेत्रींना मात; पहा तिचे सुंदर फोटो
२४ वर्ष मोठ्या मुलीच्या प्रेमात पडले होते कमल हसन, लग्नही केले पण शेवटी…
राज्यात आणखी १५ दिवसांचे लॉकडाऊन होणार; राजेश टोपे यांचे सुचक वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.