अरे वाह! कन्यारत्न झाले म्हणून अनोख्या पद्धतीने केला आनंद साजरा, तब्बल ५० हजार लोकांना मोफत पाणीपुरी वाटल्या

भारतात मूल आणि मुली यांच्यामध्ये भेदभाव करणाऱ्या आपण अनेक घटना पाहत आलोय. परंतु एक घटना मध्यप्रदेश भोपाळमधील आहे. इथे मुलीच्या जन्मावर, एका वडिलांनी असा उत्सव साजरा केला की बघणारे बघतच राहिले.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे राहणाऱ्या आंचल गुप्ताच्या घरी 17 ऑगस्ट रोजी कन्यारत्नचा लाभ झाला, याच आनंदात त्यांनी 12 सप्टेंबर रोजी लोकांना मोफत पाणीपुरी दिली. आंचल १४ वर्षांपासून पाणीपुरीचा गाडा चालवतात, त्यांनी आधीच विचार केला होता की जर मुलगी जन्माला आली तर ते तिचे भव्य पद्धतीने स्वागत करतील. इच्छेप्रमाणे 17 ऑगस्ट रोजी त्यांना मुलगी झाली. आपला आनंद एका अनोख्या पद्धतीने लोकांमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेत 12 सप्टेंबर रोजी त्यांनी 50 हजार लोकांना पाणी-पुरी मोफत दिल्या.

यासाठी तब्बल पाच तासांसाठी 10 स्टॉल लावण्यात आले होते. लोकांना मोफत पाणी-पुरीची माहिती देण्यासाठी बॅनरही लावले होते. लोकांना या ऑफरची माहिती होताच पाणी पुरी खाणाऱ्यांची तुडुंब गर्दी झाली, शेकडो लोक जमले.

रविवारी दुपारी 1 ते संध्याकाळी 6 या वेळेत दुकानात आलेल्या सर्व ग्राहकांना मोफत पाणीपुरी देण्यात आल्या. त्यांनीं एकूण 10 स्टॉल्स लावले होते, जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्याचा लाभ घेऊ शकतील. पाच तासांच्या दरम्यान त्यांनी 50 हजार लोकांना पाणीपुरी खाऊ घातल्या. यादरम्यान स्थानिक प्रतिनिधीनींही तेथे हजेरी लावली.

गुप्ता दांपत्य यांना दोन वर्षांचा मुलगा देखील आहे. मुलीच्या जन्मापूर्वीच दांपत्याने विचार केला होता की ते मुलीचा जन्म अनोख्या पद्धतीने साजरा करतील. त्याचबरोबर त्यांना हा संदेशही द्यायचा होता की “आयुष्यात मुलीपेक्षा मोठा आनंद नाही. मुलगी म्हणजे ओझे नाही, तर वरदान आहे”.

आंचल यांनी वाढलेली गर्दी पाहता वारंवार कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले, तसेच रांगेत उभ्या असलेल्या लोकांना मास्क घालायला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायला सांगितले. पण पाणीपुरीचा आस्वाद लुटण्याच्या घाईत फार कमी लोकांनी त्याच्या आवाहनाकडे लक्ष दिले.

 

 

महत्वाच्या बातम्या
ब्रिटीशांच्या काळात भारतातील राजे-महाराजे काय करत होते? त्यांनी आवाज का नाही उठवला?
महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा दहशतवाद्यांचा कट फसला; सहा दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात
”पंतप्रधान जर विदेशातही हिंदीत बोलतात, तर आपल्याला का लाज वाटते?’ अमित शहांचा सवाल
बॉलीवूडमध्ये धडाकेबाज कामगीरी केलेली ही अभिनेत्री वळली अध्यात्माकडे; हे आहे त्यामागचं कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.