…अन् तहसीलदाराने गॅसवर जाळले तब्बल 20 लाख रूपये; कारण वाचून धक्का बसेल

सिरोही | राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घटली आहे. लाच घेताना सापडलेल्या एका तहसीलदाराने एसीबीच्या पथकासमोरचं तब्बल 20 लाख रूपयांची रक्कम जाळून टाकली असल्याचा प्रकार समोर आला आहे. तहसीलदार आणि त्याची पत्नी गॅसवर नोटा जाळत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, सिरोहीमधील पिण्डवाडामध्ये एका महसूल अधिकाऱ्याने तहसीलदार कल्पेश जैन यांच्या सांगण्यावरून एका ठेकेदाराला 5 लाख रूपयांची लाच मागितली होती. त्यानंतर या ठेकेदाराने 1 लाख रूपये देतो असं सांगितलं.

ठेकेदाराने याची तक्रार दाखल केली होती. लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी महसूल विभागाचा अधिकारी आला असता. त्याला सापळा रचून अटक करण्यात आली. त्याची चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, पिण्डवाडाचे तहसीलदार कल्पेश जैन याच्या सांगण्यावरून लाच स्वीकारली आहे.

एसीबीचे अधिकारी तहसीलदार कल्पेश जैन याच्या बंगल्यावर छापेमारी करण्यास गेल्यावर कल्पेश जैनची अधिकाऱ्यांना पाहताच भंबेरी उडाली. अधिकारी घरामध्ये येऊ नये म्हणून जैन याने दाराला कडी लावली. त्यानंतर त्याने जे केले ते पाहून अधिकाऱ्यांना धक्काच बसला.

जैनने पत्नीसोबत मिळून स्वयंपाकघरातील गॅसवर तब्बल 20 लाख रूपयांच्या नोटा जाळून टाकल्या. नोटा जाळून टाकत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी एक तास दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण कल्पेश जैनने दरवाजा उघडला नाही. अखेर स्थानिक पोलिसांना बोलावून दरवाजा तोडून तहसीलदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. तहसीलदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करुन हेमा मालिनीने फेडले होते कर्ज; जाणून घ्या पुर्ण प्रकरण
एसीबीचे अधिकारी घरावर धाड टाकायला आले, अन् लाचखोर तहसीलदाराने जाळल्या २० लाखांच्या नोटा
गृहमंत्री अनिल देशमुखांनी लिहिलं थेट मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
मोठी बातमी! मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास थांबवा; न्यायालयाचा एटीएसला आदेश

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.