काय सांगता! ट्विंकल खन्नामूळे अजय देवगनने वाजवली होती करिश्मा कपूरच्या कानाखाली

सध्याच्या घडीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये अजय आणि काजोलची जोडी सर्वात पावरफुल जोड्यांपैकी एक आहे. दोघांच्या लग्नाला २५ वर्ष पुर्ण झाली आहेत. एवढ्या वर्षांमध्ये त्या दोघांत कधीही भांडणाच्या बातम्या समोर आल्या नाहीत. दोघेही सुखाने संसार करत आहेत.

काजोलला भेटण्यापूर्वी अजय आणि करिश्मा कपूरच्या अफेअरच्या बातम्या सगळीकडे प्रसिद्ध होत्या. काजोलमूळे दोघे वेगळे झाल्याचे बोलले जाते. पण काजोल नाही तर ट्विंकलमूळे दोघांचे ब्रेकअप झाले होते. जाणून घेऊया पूर्ण किस्सा.

जिगर’ चित्रपटाच्या सेटवर करिश्मा आणि अजयची पहिली भेट झाली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवसांमध्ये सगळीकडे दोघांच्या अफेअर बातम्या छापून येऊ लागल्या. पण त्यांनी सगळीकडे दुर्लक्ष केले आणि करिअरवर लक्ष दिले.

अजय आणि करिश्माने जिगर आणि सुहाग सारख्या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यामुळे दोघांची जोडी चांगलीच हिट झाली होती. करिश्माने तर अजयसोबत लग्न करण्याची सगळी तयारी केली होती. पण अजय मात्र एवढ्या लवकर लग्नाला तयार
नव्हता. म्हणून तो कामावर लक्ष देऊ लागला.

Karishma Kapoor and Ajay Devgan shown to user

याच कालावधीमध्ये अजयने ट्विंकल खन्नासोबत चित्रपट साइन केला. या चित्रपटाच्या शुटींग वेळी अजय आणि ट्विंकलमध्ये जवळीक वाढू लागली. ही गोष्ट करिश्मापर्यंत गेली. त्यावेळी तिने थोडं दुर्लक्ष केले. पण जेव्हा अजय तिचे फोन उचलत नव्हता. तेव्हा मात्र ती टेन्शनमध्ये आली.

अजयला न सांगता करिश्मा त्याच्या चित्रपटाच्या सेटवर गेली. तिथे अजय आणि ट्विंकल एकत्र बसून त्यांची काम करत होते. दोघांना जवळ बघून करिश्मा भडकली आणि तिने ट्विंकलसोबत भांडायला सुरुवात केली. पण ट्विंकने करिश्माला कोणतेही उत्तर दिले नाही ती शांत राहिली.

त्यामुळे करिश्मा अजयकडे आली आणि तिने भांडायला सुरुवात केली. सगळ्या स्टाफसमोर करिश्मा अजयला ओरडत होती. पण अजय शांत बसला कारण त्याला समजले की, करिश्मा चिडली आहे. म्हणून ती रागात काहीही बोलत आहे.

काहीही केलं तरी करिश्मा शांत व्हायला तयार नव्हती. तिने ट्विंकलला परत ओरडायला सुरुवात केली. हे सगळं वाढत होत म्हणून अजयने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण शांत झाली नाही. शेवटी चिडलेल्या अजयने करिश्माच्या कानाखाली वाजवली.

हे सगळं काही सेटवरील लोकांसमोर होत होते. पण कोणीही काहीही करू शकत नव्हते. अजयने ट्विंकलमूळे करिश्मावर हात उचलला होता. म्हणून शेवटी चिडलेली करिश्मा सेटवरून निघून गेली. या घटनेनंतर काही दिवसांमध्येच अजयच्या आयुष्यात काजोलने प्रवेश केला आणि त्याचे करिश्मासोबत ब्रेकअप झाले.

महत्वाच्या बातम्या –

ड्रामा क्वीनचा नवा ड्रामा! पीपीई किट घालून अभिनेत्रीने केली भाजी खरेदी; पाहा व्हिडिओ

कसा काय रातोरात स्टार झाला एक साधारण जिंगल बनवणारा मुलगा, वाचा त्याची यशोगाथा

…म्हणून बायको ऐश्वर्याला ऑनस्क्रीन किस करत नाही अभिषेक बच्चन

शाहरूख खानला वाटत होते; राम मंदिराची पायाभरणी मुस्लिमांनी, तर मशिदीची हिंदुंनी करावी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.