‘या’कारणामुळे जॅकलीन फर्नांडिसने सोडले सलमान खानचे फार्म हाऊस

 

मुंबई | लॉकडाऊन सुरू झाल्यापासून जॅकलीन फर्नांडिस सलमान खानच्या फार्महाऊसवर त्याच्या कुटुंबासोबत राहत होती. पण तिने आता सलमान खानचे फार्म हाऊस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

जॅकलिनची एक मैत्रीण मानसिक तणावाखाली आहे. या कठीण काळात तिला आधार देण्यासाठी जॅकलीन आता मैत्रिणीच्या घरी राहणार असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

लॉकडाऊनच्या काळामध्ये जॅकलीने सलमानबरोबर एक गाणेही तयार केले होते. या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

आपल्या मैत्रिणीला अडचणीच्या काळात साथ देण्यासाठी घेतलेल्या तिच्या या निर्णयाचे आता अनेकांकडून स्वागत होताना दिसत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.