सनी देओलच्या एका हट्टामूळे झाले होते धर्मेंद्रचे करोडोंचे नुकसान

फिल्म इंडस्ट्रीतील काही हट्टी आणि रागीट अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सनी देओल. सनी देओल स्वभावाने खुप शांत आहे. त्याच्याकडे बघून कोणालाही त्याच्या रागाचा आणि हट्टी स्वभावाचा अंदाज येणार नाही. पण खऱ्या आयूष्यात मात्र सनी देओल अतिशय रागीट आणि हट्टी स्वभावाचा आहे.

सनी देओलने एखाद्या गोष्टीचा हट्ट केल्यानंतर तो ती गोष्ट पुर्ण करुनच राहतो. त्याला त्याच्या हट्टी स्वभावामूळे अनेकदा नुकसान होते. पण तरीही तो हट्ट सोडत नाही. याच स्वभावामूळे सनी देओलने एकदा धर्मेंद्रचे करोडो रुपयांचे नुकसान केले होते.

वडीलांचे करोडोंचे नुकसान झाले तरी सनी देओलने त्याचा हट्ट सोडला नाही. याच कारणामूळे दोघा बाप लेकांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. इंडस्ट्रीमध्ये देखील या गोष्टीची खुप जास्त चर्चा झाली होती. जाणून घेऊया नक्की काय आहे हा किस्सा.

धर्मेंद्र त्यांच्या दोन्ही मुलांच्या करिअरला घेऊन खुपच सिरीयस होते. त्यांना काहीही झाले तरी मुलांना इंडस्ट्रीचे स्टार बनवायचे होते. त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. याच काळात धर्मेंद्र एनआयराय दिग्दर्शक गुरुविंद्र चड्डाच्या कामाने खुप जास्त प्रभावित झाले होते.

१९९९ मध्ये त्यांनी गुरुविंद्र चड्डाला बॉलीवूडमध्ये त्यांच्या दोन्ही मुलांना घेऊन एक चित्रपट बनवायला सांगितला होता. धर्मेंद्रने त्यांच्या निर्मिती कंपनीत दोन्ही मुलांना घेऊन लंडन चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटाची शुटींग सुरु झाल्यानंतर दिग्दर्शक चड्डा आणि सनी देओलमध्ये वाद सुरु झाले.

सुरुवातीच्या काळात त्यांचे वाद छोटे होते. पण नंतर मात्र ते मोठ्या प्रमाणात वाढत गेले. एक दिवस त्यांच्या छोट्आ वादाचे रुपांतर मोठ्या भांडणामध्ये झाले. शेवटी चिडलेल्या दिग्दर्शकाने हा चित्रपट अपूर्ण सोडून दिला. त्यानंतर सनीने त्याच्या आवडत्या दिग्दर्शकला बोलवून घेतले.

पण ही गोष्ट धर्मेंद्रला मान्य नव्हती. त्यांनी सनीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण सनी मात्र त्याचा हट्ट सोडायला तयार नव्हता. काहीही झाले तरी तो वडीलांचे ऐकायला तयार नव्हता. त्याने चित्रपटात अनेक बदल केले. धर्मेंद्रने चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेतला. पण सनीने असे करण्यास नकार दिला. तो त्याच्या हट्टावर कायम राहिला.

एवढेच नाही तर सनीने चित्रपटाची अभिनेत्री करिश्मा कपूरला बदलले. त्याने करिश्माच्या जागी उर्मिला मातोंडकरला चित्रपटात घेतले. उर्मिला सनीसाठी अनलकी ठरला आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. चित्रपटावर धर्मेंद्रचे करोडो रुपये खर्च झाले होते. पण सनीच्या एका हट्टाने धर्मेंद्रचे करोडोंचे नुकसान केले.

महत्वाच्या बातम्या –
सलमान खान, माधूरी दिक्षितसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करणाऱ्या साहिला चड्डाची आज झाली आहे वाईट अवस्था
अमिताभ बच्चनने दुसऱ्यांदा राजकारणात यायला दिला नकार; चिडलेल्या राजीव गांधीने राजेश खन्नाला बनवले स्टार
‘हम आपके है कौन’ चित्रपटात सलमान खानच्या मागे पळणारी रिटा आठवते का? आज दिसते ‘अशी’
राजकूमार संतोषीपासून विक्रम भट्टपर्यंत ‘हे’ दिग्दर्शक त्यांच्याच अभिनेत्रीच्या प्रेमात झाले होते पागल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.