रजनीकांत आणि माधुरी दीक्षितची जवळीक वाढत होती; म्हणून दिग्दर्शकाने चित्रपटाची स्क्रिप्ट बदलली

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकदा चित्रपटांच्या सेटवर कलाकारांमध्ये जवळीक वाढते. त्यामुळे चित्रपटांच्या निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत चित्रपटांचे निर्माते कलाकारांना दुर करण्यासाठी प्रयत्न करत असतात.

असाच काही प्रयत्न सुभाष घईने देखील केला होता. त्यांच्या या प्रयत्नामुळे कलाकारांमध्ये जवळीक वाढली नाही. पण त्यांच्या चित्रपटाचे मात्र खुप नुकसान झाले. त्यांचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. जाणून घेऊया पुर्ण किस्सा.

हा किस्सा आहे ८० च्या दशकातील. सुभाष घई त्यांच्या चित्रपटांमूळे खुप चर्चेत असायचे. कारण त्यांचे सगळे चित्रपट सुपरहिट व्हायचे. सुभाष घईने त्यांच्या चित्रपटांमूळे अनेक अभिनेत्रींना सुपरस्टार बनवले आहे.

त्यांनी नवीन अभिनेत्रींना बॉलीवूडमध्ये लाँच देखील केले आहे. एक खास गोष्ट म्हणजे सुभाष घईचे नाव नेहमीच त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील अभिनेत्रीसोबत जोडले गेले आहे. म्हणून सुभाष त्यांच्या अभिनेत्रींची खुप काळजी घ्यायचे. त्यांना दुसरं कोणत्याही अभिनेत्यासोबत मैत्री करू द्यायचे नाही.

१९८७ मध्ये सुभाष घईने ‘उत्तर दक्षिण’ चित्रपटाची घोषित केली. या चित्रपटामध्ये त्यांनी रजनीकांत आणि माधुरी दीक्षितला मुख्य भूमिकेत घेतले होते. माधुरीने रजनीकांचे नाव ऐकल्यानंतर लगेच या चित्रपटाला होकार दिला होता.

माधुरी दीक्षित रजनीकांतची खुप मोठी फॅन होती. माधुरीला रजनीकांतसोबत काम करण्याची संधी सोडायची नव्हती. म्हणून तिने लगेच होकार दिला. या चित्रपटाची शुटिंग सुरू झाली. शुटिंग सुरू झाल्यानंतर रजनीकांत आणि माधुरीमध्ये खुप चांगली मैत्री झाली होती.

हे दोघे एकमेकांसोबत चांगला टाईम स्पेन्ड करत होते. असे बोलले जात होते की, माधुरी रजनीकांतच्या प्रेमात पडली आहे. म्हणून ती चित्रपटाच्या सेटवर लवकर यायची. माधुरी रजनीकांतसाठी घरून जेवण बनवून आणायची.

या सगळ्या गोष्टी सुभाष घई बघत होते. त्यांना हे सगळं काही आवडलं नाही. त्यांनी माधुरीला रजनीकांतपासून लांब राहण्याचा सल्ला दिला. पण माधुरीने त्यांचा सल्ला ऐकला नाही. ती रजनीकांतसोबत टाईम घालवत होती.

शेवटी कंटाळून सुभाष घईने स्वतः माधुरीला रजनीकांतपासून लांब करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये अनेक बदल केले. त्यांनी चित्रपटातील रजनीकांत आणि माधुरीचे अनेक सीन्स रद्द केले.

त्यासोबतच त्यांनी स्क्रिप्ट बदलली आणि माधुरी आणि रजनीकांतच्या शुट टाईम देखील वेगवेगळा केला. म्हणून चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांच्या भेटी होत नव्हत्या. ते एकमेकांपासून लांब गेले. पण तरीही या दोघांची मैत्री कायम होती.

सुभाष घईच्या प्रयत्नांमूळे माधुरी दीक्षित आणि रजनीकांतच्या भेटी कमी झाल्या. पण त्यांची मैत्री मात्र तुटली नाही. दुसरीकडे सुभाष घईने चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये अनेक बदल केले होते. म्हणून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.

प्रेक्षकांना या चित्रपटातील माधुरी आणि रजनीकांतच्या जोडीची जादू दिसली नाही. हा चित्रपट खूप मोठा फ्लॉप झाला. म्हणून सुभाष घईचे करोडोचे नुकसान झाले. दुसऱ्यांची मैत्री तोडणाऱ्या सुभाष घईचे स्वतः चे नुकसान झाले.

महत्त्वाच्या बातम्या –

राजेश खन्नाच्या करिअरचा शेवट यश चोप्रामूळे झाला होता?

म्हणून आई अमृता साराला म्हणाली होती तु तर भिकारी दिसत होतीस

श्रीदेवी आणि कमल हसनच्या नात्याचे ‘हे’ सत्य तुम्हाला माहीती आहे का?

बापरे!अजय देवगनसाठी रविना टंडनने स्वतः च्या हाताची नस कापून घेतली होती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.